गुरुवार, २३ जानेवारी, २०१४

बोधीसत्व सुमेध आणि भगवान दीपंकर बुद्ध...


शेकडो वर्षांपुर्वी या लोकात भविष्य काळातील बुद्ध अमरावती नावाच्या संपन्न शहरात जन्मला सुमेध असे त्याचे नाव होते. सुमेध हा अमरावती शहरातील एका श्रीमंत दाम्पत्याचा एकुलता एक मुलगा होता. त्याचे पालक हे पिढीजात श्रीमंत आणि सदाचारात शुद्ध होते.


सुमेध हा शिक्षण घेत असतानाच त्याच्या पालकाचे निधन झाले, त्यावेळेस तो सोळा वर्षांचा. वयात येईपर्यंत त्याच्या खजीनदाराने त्याच्या संपत्तीचे रक्षण केले.


जेव्हा त्याने पहिल्यांदा आपली संपत्ती बघितली तेव्हा तो स्वतःशीच म्हणाला, माझे पिता, माझे आजोबा, माझे पंजोबा आणि त्यांच्यापुर्वीच्या अनेक पिढ्या केवळ या संपत्तीची कमाई करु शकले, तिचे संवर्धन करु शकले परंतु मेल्यानंतर ते त्या संपत्तीला आपल्या सोबत घेऊन जाऊ शकले नाही. हि सर्व संपत्ती मी आपल्या सोबत घेऊन जाऊ शकणार काय..?


त्याचक्षणी त्याने यावर अतिशय खोल विचार केला. आणि त्याच्यात नवे चैतन्य संचारले. त्याने विचार केला कि जिथे उष्णता आहे तिथे शितलता नक्कीच आहे. त्याचप्रमाणे जिथे मरण आहे तिथे अमरता असायला हवी.


त्यानंतर त्याने आपल्या खजीन्याचे घर उघडले आणि आपली सर्व संपत्ती दान केली. आणि तो परिव्राजक बनला. केवळ सात दिवसांमध्येच त्याला श्रेष्ठ मानसीक शक्ती प्राप्त झाली....
भगवान दीपंकर बुद्धांचे आगमनभगवान दीपंकर बुद्धांच्या आगमनाचा तो सोनेरी क्षण होता. शहरातील लोक बुद्धांच्या आगमनाची तयारी करत होते. रस्त्यांची सजावट दुरुस्ती चालली होती, सर्वजन भगवान दीपंकर बुद्धांची आतुरतेने वाट पाहत होते. श्रमण सुमेधाने बघितले कि नागरीक शहराच्या सजावटीमध्ये व्यस्त आहेत. हे सर्व पाहुन त्याला अश्चर्य वाटले. तो त्यांच्या जवळ आला आणि सुरु असलेल्या प्रकाराबद्दल विचारणा केली. तेव्हा त्यांनी सांगीतले कि आम्ही हे ऐकुन श्रमण सुमेधाला अतिशय आनंद झाला आणि तो म्हणाला, बुद्ध हा शब्द ऐकणे खुप कठीण आणि दुर्मीळ आहे आणि बुद्धत्वाची प्राप्ती करणे अतिशय कठीण. श्रमण सुमेधाने विनंती केली कि मला सुद्धा तुमच्या या पवित्र कार्यामध्ये सहभागी होऊ द्या.


रस्ते दुरुस्तीचे आणि शहर सजावटीचे कार्य त्याला त्याच्या असामान्य कार्यक्षमतेने करावे लागणार होते. परंतु ते काम पुर्ण होण्यापुर्वीच भगवान दीपंकर बुद्धांचे त्यांच्या श्रावक संघासोबत शहरात आगमन झाले. भगवान बुद्धांच्या पवित्र पायांना धुळीने स्पर्श होऊ नये यासाठी श्रमण सुमेध एखाद्या पुलाप्रमाणे आडवा झाला.


भगवान बुद्धांची ती आर्य किर्ती पाहुन सुमेधला वाटले कि, माझी तर इच्छा आहे कि मी आजच अर्हंतपदाची प्राप्ती करावी. परंतु माझ्यासाठी चुकिच्या मार्गावर असलेल्यांना योग्य मार्गावर आणने हे सध्या योग्य नाही जेव्हा सर्व प्राण्यांचे जीवांचे संरक्षण करण्याची शक्ती माझ्याकडे आहे. मी भगवान दीपंकर बुद्धांप्रमाणे बुद्ध बनण्याचा प्रयत्न करेन..


त्यानंतर सुमेध म्हणाला,• बुद्धो बोदेय्यम : मी चार आर्यसत्य जाणु शकेन जेणे करुन मी इतरांना त्यांच्याबद्दल सांगु शकेन.
• मुत्तो मोचेय्यम : ज्याप्रमाणे मी जीवनाच्या बंधनातुन मुक्त झालो त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे त्या सर्व बंधनातुन मी सर्वांना मुक्त करेन.
•तिन्नो तरेय्यम : ज्याप्रमाणे मी जीवनाचा अर्णव तरलो त्याचप्रमाणे इतरांनाही त्याबद्दल मार्गदर्शन करेन..त्या तेजस्वी सुमेधाला पाहुन भगवान दीपंकर बुद्ध म्हणाला, हा तरूण श्रमण आपल्या जीवाची पर्वा न करता पुलासारखा जमीनीवर लेटुन आहे, यात काही संशय नाही कि भविष्यामध्ये हा माझ्यासारखा सम्यक संबुद्ध बनेल.
भगवान बुद्धांच्या वाणीतुन हि गोष्ट कळताच नागरीकांना अतिशय आनंद झाला आणि त्यांनी सुमेधाचा आदर सत्कार केला.


भगवान बुद्ध त्याच्या अंगावर पाय ठेऊन समोर गेले नाही, भगवान बुद्धांप्रमाणेच त्याचा बाजुने समोर गेले. भगवान दीपंकर बुद्धांच्या या वक्तव्याचा श्रमण सुमेधाने अतिशय आदरपुर्वक स्वीकार केला. त्यामुळे त्याला अतिशय आनंद झाला होता...


भगवान बुद्धांनी देव व मनुष्यांची एक परिषद बोलाविली ज्यामध्ये त्यांनी सांगीतले कि सुमेध हा बुद्धत्वाची प्राप्ती करणार. भगवान बुद्धांनी, अर्हंतांनी, देवांनी व मनुष्यांनी त्या सभेमध्ये सुमेधाला पुष्पगुच्छ भेट दिले आणि भगवान बुद्धांना त्याने नमस्कार केला आणि भगवान बुद्धांनी सुमेधाला दहा पारमितांची देशना केली.


त्या पुढीलप्रमाणे :• दान
• शील
• नैष्कर्म
• विर्य
• क्षांती
• सत्य
• अधिष्ठान
• मैत्री
• उपेक्षा...


हे ऐकताच उपस्थीत सर्व जन उद्गारले साधू..! साधू..! साधू..!


बोधीसत्व बनल्यावर मनुष्य खालील व्याधींपासुन मुक्त होतो.


• आंधळेपणा
• बहिरेपणा
• वेडेपणा 
• मुकेपणा 
• लंगडे पणा
• तो रानटी राष्ट्रामध्ये जन्म घेत नाही.
• तो गुलामाच्या गर्भात जन्म घेत नाही.
• तो चुकिच्या श्रद्धांपासुन (अंधश्रद्धा) मुक्त होतो.
• तो पाच गुन्ह्यांपासुन मुक्त होतो. तो आपल्या माता पित्याचा आणि अर्हंताची हत्या करु शकत नाही. आणि बुद्धालाही कोणती हानी पोहोचवु शकत नाही. 
• तो कुष्ठरोगापासुन मुक्त होतो.. इत्यादी..


निरनिराळ्या बोधीसत्वांच्या काळात बोधीसत्वाने अनेक जन्म घेतले ते पुढीलप्रमाणे :

१. दीपंकर बुद्धां : सुमेध
२. कौण्डिण्य बुद्ध : विजितवी
३. मंगल बुद्ध : सुरुची
४. सुमन बुद्ध : अतुल
५. रेवत बुद्ध : अतिदेव
६. शोभीत बुद्ध : सुजाता
७. अनोमदस्सी बुद्ध : यक्ष
८. पदुम बुद्ध : सिंह
९. नारद बुद्ध : परिव्राजक
१०. पदुमुत्तरा बुद्ध : जटील
११. सुमेध बुद्ध : उत्तरा
१२. सुजाता बुद्ध : सम्राट
१३. पियदस्सी बुद्ध : कश्यप
१४. अत्तदस्से बुद्ध : सुशिम (परिव्राजक)
१५. धम्मदस्सी बुद्ध : शक्र (देवांचा राजा)
१६. सिद्धार्थ बुद्ध : मंगल (परिव्राजक)
१७. तिस्स बुद्ध : सुजीत (राजा)
१८. फुस्स बुद्ध : विजितवी (राजा)
१९. विपस्सी बुद्ध : ड्रॅगन
२०. सिखी बुद्ध : अरिंदम
२१. वेस्सभु बुद्ध : सुदर्शन (राजा)
२२. कुकुसंध बुद्ध : खेमा
२३. कोनागमन बुद्ध : पब्बत (राजा)
२४. काश्यप बुद्ध : ज्योतीपाल

खुप काळानंतर बोधीसत्वाने दहा पारमिता आचरणात आणल्या, आणि त्याने त्याचा शेवटचा जन्म शाक्य कुळातील राजा शुद्धोधनाची पत्नी महामाया हिच्या गर्भात घेतला, वयाच्या एकोणतीसाव्या वर्षी त्याने गृहत्याग केला आणि सहा वर्षाच्या कठोर तपश्चर्येनंतर बुद्धत्त्वाची प्राप्ती करुन घेतली...

सदर पुस्तक प्राप्त करण्यासाठी फोटोवर क्लिक करा...See Also :


भगवान बुद्धांचा धम्म निराळा आहे... (धम्मगुण - नक्की वाचा)

नव-बौद्धांवर वाढत चाललेला अजीत केसकंबलाच्या पंथाचा प्रभाव : धोक्याची घंटा....

गृहस्थांची कर्तव्ये... (पुजेचा खरा अर्थ : नक्की वाचा)

जयमंगल अष्टगाथा आणि त्यांच्या कथा (भाग ६ : सच्चक नावाच्या निर्गंथ पुत्रावर विजय)

३ टिप्पण्या:

  1. प्रत्युत्तरे
    1. शेवटचा जन्म अर्थात त्यानंतर जन्म नाही. बौध्द मान्यतेप्रमाणे एक जीव आपल्या कर्माप्रमाणे अनेकदा जन्म घेतो, जेव्हापर्यंत त्याला निर्वाण प्राप्त होत नाही, त्याच्या सर्व तृष्णांचा क्षय होत नाही... जेव्हा एखादा जीव आपल्या मनाच्या सर्व विकारांवर विजय मिळवून अमृत तुल्य अशा निर्वाण पदाची प्राप्ती करतो, तेव्हा तो सर्व जन्म मरणांच्या फेऱ्यातून मुक्त होतो, आता त्याचे पुनर्जन्म होत नाही...

      हटवा