मराठी सुत्तनिपात


मराठी इंटरनेट विश्वातील बौद्ध साहीत्याची कमतरता लक्षात घेऊन,, सामान्य वाचकांना समजणाऱ्या सोप्या अशा मराठी भाषेमध्ये मराठी धम्मपदानंतर तुमच्यासाठी मराठी सुत्तनिपात आम्ही घेऊन आलो आहोत...



सुत्तनिपात हा ग्रंथ सुत्तपिटकातील खुद्यकनिकायाचा पाचवा ग्रंथ आहे. खुद्यक निकायामध्ये एकुण १५ ग्रंथ आहेत. पाली साहित्यामध्ये धम्मपदानंतर सुत्तनिपात हा अत्यंत महत्त्वाचा ग्रंथ आहे. हा प्राचीन ग्रंथ आहे. या ग्रंथामध्ये भाषा आणि विचार यामध्ये स्वाभाविकपणे नैसर्गिकता आणि सरळता असुन बौद्ध धर्माच्या विकासाची पहिली अवस्था आहे. चार आर्यसत्य , आर्य अष्टांगिक मार्ग यावर भर देऊन आचरणाने निर्वाणाची प्राप्तीहोते, ज्याला धर्माचे ज्ञान आहे अशा बुद्धिमान माणसाच्या सहवासात राहावे असे सुत्तनिपातामध्ये सांगीतले आहे.



सुत्तनिपातामध्ये सुत्ते गद्य-पद्य मिश्रीत आहेत. ६२ सुत्रे असुन ती पाच विभागात विभागली आहेत. उरगवग्ग, चुलवग्ग, महावग्ग, अट्ठकवग्ग, पारायणवग्ग हे पाच भाग आहेत. या ग्रंथामध्ये शेतकरी कसे होते, ब्राह्मण कोणाला म्हणावे, उरगसुत्त, मांगडीयसुत्त, अत्तदंडसुत्त, मुनीसुत्त, खग्गंविसाणसुत्त इ. सुत्तात मनुष्यांनी आदर्श कसे असावे याचे वर्णन केले आहे. वसलसुत्तामध्ये निच कोणाला म्हटले आहे ते सांगीतले आहे. कर्मानेच नीच होतो आणि कर्मानेच ब्राह्मण होतो. पारायणवग्गामध्ये जीवनाच्या सर्वश्रेष्ठ उद्देशाची दिशा दाखविली आहे. त्यामुळे हा ग्रंथ अतिशय उच्च प्रतीचा व प्रभावशाली ग्रंथ आहे. सुत्तनिपात पाली साहित्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ग्रंथ आहे.

१. उरगवग्ग

२. चुलवग्ग

३. महावग्ग

४. अट्ठकवग्ग

५. पारायणवग्ग



सदर पुस्तक प्राप्त करण्यासाठी फोटोवर क्लिक करा...





See Also :



मराठी धम्मपद

२ टिप्पण्या: