शुक्रवार, ३ जानेवारी, २०१४

नव-बौद्धांवर वाढत चाललेला अजीत केसकंबलाच्या पंथाचा प्रभाव : धोक्याची घंटा....

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी नागपुर शहरातील दीक्षाभुमीवर १४ ऑक्टोबर १९५६ साली विजयादशमीच्या मंगल दिवशी आपल्या लाखो अनुयायांसह महास्थाविर चंद्रमणी यांच्याकडुन बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. धम्मदीक्षेनंतर फार थोड्या कालावधीमध्येच बाबासाहेबांचे महापरिनिर्वाण झाले आणि स्वतःला बाबासाहेबांचे कट्टर अनुयायी समजणाऱ्या प्रत्येकांनी आपापल्या सोयीचा आंबेडकरवाद निर्माण केला. काहींच्या मते देवधर्माला न मानने म्हणजे आंबेडकरवाद तर काहींच्या हिंदु धर्माला शिव्या देणे म्हणजे आंबेडकरवाद, इत्यादी इत्यादी.... अशाप्रकारेच या समाजाची वाटचाल सुरु आहे....


धम्मदीक्षेच्या इतक्या वर्षांनंतरही या समाजावर आपल्या जुन्या धर्माचा प्रभाव आहे तर काही टोकाचे नास्तीक बनले आहेत... त्यांच्या अशा वागणुकीमुळे इतर समाजातील लोकांचा बौद्ध धर्माकडे बघण्याचा दृष्टीकोनच अगदी बदलुन गेला आहे....



त्यांच्या अशा वागणुकींच्या मुळात त्यांच्यावर असलेल्या अजीत केसकंबलच्या पंथाचा प्रभाव आहे.





कोण आहे हा अजीत केसकंबल...? त्याचा आणि नव-बौद्धांच्या वागणुकीचा संबंध काय....?



अजीत केसकंबल हा बुद्धाचा समकालीन होता. (त्याचा उल्लेख सुत्तपिटकात, दिग्घनिकायाच्या श्रमणफल सुत्तामध्ये, तर The Buddha and His Dhamma च्या Book 1 Section 6 मध्ये आला आहे.) तो पुर्ण नास्तीक होता.


तत्कालीन ब्राह्मणव्यवस्थेचा तो अत्यंत आणि कडवा विरोधक होता.... त्याला ब्राह्मणांचे यज्ञ आवडत नव्हते, तर श्रमणांची तपश्चर्या सुद्धा त्याला मान्य नव्हती. एकुणच तो श्रमण आणि ब्राह्मण अशा दोघांचाही विरोधक होता. परंतु त्याला श्रमणच समजले जात असे. अजीत केसकंबल म्हणतो,,


अग्नीहोत्रं त्रयो वेदास्त्रिदण्डं भस्मगुण्ठन्म! बुद्धीपौरुषहीनांना जिविका धातृनिर्माता!!

अर्थ : अग्नीहोत्र, तीन वेद, त्रीदण्ड धारण करणे आणि भस्म लावणे, हे निर्मात्याने निर्मिलेली बुद्धीहीन आणि पौरुषतत्व हीन पुरुषांची उपजिविका आहे.


यावरुन त्याचा ब्राह्मण आणि वेदविरोध कळतो, तो उच्छेदवादी होता...


उच्छेदवादी म्हणजे,, त्याचा असा सिद्धांत होता कि,, चार महाभुतांपासुन आपले शरीर निर्माण झालेले आहे. त्याच्या कर्मफळावर विश्वास नव्हता, तो म्हणायाचा चांगल्या वा वाईट कर्माचे फळ मिळते हि अत्यंत चुकीची आणि खोटी गोष्ट आहे, आपले शरीर हे चार महाभुतांपासुन बनलेले आहे मेल्यानंतर ते सर्व तत्त्व निसर्गात विलीन होतात. स्वर्ग, नरक, पुनर्जन्म इत्यादी कल्पना - संकल्पना खोट्या आहेत. दानाची प्रशंसा मुर्ख करतात. असा हा नास्तिक अजीत केसकंबल आजच्या आधुनीक युगातील नास्तिकांचा किंवा फेसबुकवर धर्माला अफुची गोळी समजणाऱ्या, फेसबुकवर येशू ख्रिस्तांवर अश्लाघ्य टीका करणाऱ्या नास्तीकांचे गॉडफादर किंवा शास्ताच आहेत....


अशा या अजीत केसकंबलाचा पुनर्जन्मावर वा कर्मफळावर विश्वास नसल्यामुळे खा प्या मजा करा हा त्याचा सिद्धांत होता, सदाचाराला त्याच्या धर्मामध्ये जागा नव्हती.. त्याचा अर्थ दुराचाराला जागा होती असाही नव्हे...


आता अजीत केसकंबल आणि नव-बौद्धांच्या (बामसेफी वृत्तीच्या) धर्मामध्ये तुलना केली असता दोघांचा धर्म जवळपास सारखाच आहे असा आभास होतो.



डॉ. बाबासाहेबांनी धम्मदीक्षेच्या प्रसंगी आपल्या सविस्तर भाषणामध्ये म्हटले होते. सदाचारी बना, तुमचे आचरण शुद्ध असायला हवे, बुद्धाच्या धर्मानुसार आचरण करा, बुद्धाच्या धर्माविरुद्ध वागु नका नाहीतर लोक म्हणतील, 'महारांनी एवढा चांगला बौद्ध धर्म स्वीकारला आणि त्याला बाटवला' अशी पाळी तुमच्यावर येता कामा नये. परंतु त्यांच्यावरील वाढत चाललेल्या अजीत केसकंबलच्या प्रभावामुळे हे खरे होताना दिसत आहे.




बुद्ध हे नास्तिक नव्हते....



भगवान बुद्ध जरी निरिश्वरवादी असले तरी ते नास्तिक नव्हते, त्यांचा ईश्वरावर विश्वास नाही परंतु धर्मावर विश्वास आहे, कर्मावर विश्वास आहे, पुनर्जन्मावर विश्वास आहे. मोक्षावर (निर्वाण!) विश्वास आहे. हा अंधविश्वास नव्हे, हे सर्व सम्यक संबुद्धाचे अनुभव आहेत. कोणीही ज्याचा स्वतः अनुभव घ्यावा...


परंतु हे नवबौद्ध भगवान बुद्धांचे मुळ सिद्धांत आणि शिकवणीला पायदळी तुडवुन, सदाचाराची सीमा ओलांडुन दुसऱ्या धर्मावर, दुसऱ्यांच्या श्रद्धांवर अश्लाघ्य टीका करत असतात, हाच त्यांचा खरा धर्म बनलेला आहे, (ज्याचा संस्थापक अजीत केसकंबल होता..) अशा सर्वांनी स्वतःला बुद्धाचा शिष्य आहे असे सांगु नये....

डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात बुद्धाचा धर्म म्हणजे नीति . बौद्ध धर्मात देवाची जागा नीतिने घेतली आहे. बौद्ध धर्मामध्ये ईश्वराला महत्त्व नाही, तो निरिश्वरवादी आहे, परंतु याचा अर्थ असा नव्हे कि तो तुम्हाला अस्तित्व नसलेल्या ईश्वराला शिविगाळ करण्याची परवानगी देतो... भगवान बुद्ध आपल्याला निर्वाणप्राप्तीचा मध्यम मार्ग सांगतात. त्याला तुमच्याकडुन गौरव नको आहे, तुम्ही सदाचारी बनावे हिच त्याची अपेक्षा आहे. कोणत्या धर्माला शिविगाळ करण्यापेक्षा आपण निर्वाणप्राप्तीचे ध्येय समोर ठेऊन, मध्यम मार्गावरुन चालण्याचा प्रयत्न करावा हाच बुद्धाचा धर्म आहे.



इतर धर्मीयांवर टिका करणारे बामसेफी नवबौद्ध हे बौद्ध धर्मीय नसतात. मुळतः ते नास्तीक असल्या कारणाने त्यांच्या जीवनाचे कोणतेही ध्येय नसते त्यामुळे ते विशिष्ट समाजाला टारगेट करत असतात. आणि हाच बुद्धाचा धर्म असल्याचा प्रचार करत असतात आणि बुद्धाच्या सदाचारावरील प्रवचनांची उदाहरणे दिली असता भटांनी भेसळ केली असे सांगतात आणि The Buddha & His Dhamma मधील संदर्भ दिले असता भटांनी प्रकाशीत केलेल्या पुस्तकातील संदर्भ देऊ नकोस असे सांगतात, तेव्हा यांच्या मनोवृत्तीची खरच खुप कीव येते, अशा असुरांना आणि मारांना निर्वाण प्राप्तीसाठी आणखी किती जन्म घ्यावे लागणार याचा विचार येतो...


काही जण म्हणतात डॉ. बाबासाहेबांनी त्रिपिटक नाकारला., मग स्वीकारला काय...? त्रिपिटक नाकारणे म्हणजे बुद्धाचा धर्मच नाकारणे होते. काही लोक समजतात तसा बाबासाहेबांनी दीक्षा दिलेला बौद्ध धर्म मुळ बौद्ध धर्मापेक्षा जराही वेगळा नाही आहे. डॉ. बाबासाहेबांनी थेरवादी बौद्ध धर्माची दीक्षा दिली. (आपण चर्चा करु शकतो)




वाईट प्रथांचा विरोध करणे बुद्धाच्या धर्माच्या विरोधी आहे का....?



नाही..! वाईट प्रथा, परंपरा यांचा विरोध करावा. परंतु नैतिकतेच्या चौकटीत राहुन, सदाचाराच्या कक्षेत राहुनच... परंतु एखाद्या विशिष्ट समाजावर, जातीवर, धर्मावर सातत्याने गरळ ओकणे, शिविगाळ करणे, एखादा विशिष्ट समाजाचे असल्याने एखाद्या व्यक्तीचा द्वेष करणे हा सिद्धांत कोणता बौद्ध धर्म सांगतो....? (असे तर अजीत केसकंबल सुद्धा सांगत नाही...)


बुद्धाने नव्हता केला का, जातीसंस्थेचा विरोध, यज्ञसंस्थेचा विरोध, जन्माधारीत व्यवस्थेच विरोध....? केला होता ना पण सदाचाराच्या, नैतिकतेच्या चौकटीत राहुनच....


आपल्या बौद्ध बांधवांना बामसेफी मार्गावरुन परत सम्यक संबुद्धाच्या निर्वाण प्राप्तीच्या, सदाचारी मार्गावर आणने व योग्य धर्माचा ज्ञान देणे हाच त्याच्यावर उपाय आहे....


सुचना : बौद्ध धम्माचा स्वीकार केलेल्या मंडळींना बौद्ध म्हणुनच संबोधले पाहिजे. बौद्ध धम्मात नवबौद्ध असा वेगळा पोटभेद किंवा वेगळी जमात नाही. बौद्ध धम्मेय म्हटला की तो सर्व एकच होय. बौद्धांत नवा बौद्ध आणि जुना बौद्ध असा प्रकारच नाही. बौद्ध तेवढे सारे एका बौद्ध नावानेच ओळखले जातात, अशी वस्तुस्थिती आहे, त्यामुळे विद्वाण, जाणते यांनी भारतीय नव-दीक्षित बौद्धांना नव-बौद्ध म्हणणे सर्वस्वी चुक आहे. या समाजाला बौद्ध असेच म्हटले पाहिजे.


या लेखामध्ये नवबौद्ध हा शब्द नवदीक्षीत बौद्ध किंवा आंबेडकरी समाजाबद्दल वापरण्यात आला नसुन स्वतःला बौद्ध समजणाऱ्या बामसेफी लोकांबद्दल वापरण्यात आला आहे...


सदर पुस्तक प्राप्त करण्यासाठी फोटोवर क्लिक करा...



See Also :

भगवान बुद्धांचा धम्म निराळा आहे... (धम्मगुण - नक्की वाचा)

मराठी धम्मपद

रोहीणीच्या वडिलांची धम्मदीक्षा...

३ टिप्पण्या:

  1. आस्तिकता, नास्तिकता याचा संबंध ईश्वरवाद, आत्मावाद याच्याशी आहे. अजित कर्मसिद्धांत मान्य करीत नव्हता, तो श्रमण-ब्राम्हण दोन्हींना मानीत नव्हता म्हणून तो नास्तिक होता हे म्हणणे पटत नाही. हा शब्द आणि संकल्पना इथे लागू पडते काय? तपासून पाहिले पाहिजे. श्रमण ब्राम्हण जर चुकीच्या मार्गाने जात असतील तर त्यांना विरोधही केला पाहिजे, किमान त्यां आंधळेपणाने न स्वीकारणे यात वाईट काही आहे असे म्हणता येत नाही. बुद्धांनी अजितला कर्म-धर्म नियम लक्षात न घेतल्यामुळे फटकारले असावे , तो नास्तिक म्हणून नाही. वास्तविक नास्तिकता, आस्तिकता हा बुद्ध शिकवणीतील भाग आहे काय हेच तपासून पाहिले पाहिजे. कारण आत्मा-परमात्मा याबद्दल बुद्धांनी मौनच बाळगले असणे शक्य आहे.

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. वेदकाळापासुन आजपर्यंत सुद्धा प्रत्येक परंपरेची आस्तिक आणि नास्तिकतेची व्याख्या वेगवेगळी आहे. जसे वैदिक परंपरे प्रमाणे जो वेदप्रामाण्य नाकारतो तो नास्तिक आणि जो वेदप्रामाण्य स्वीकारतो तो आस्तिक. म्हणुनच वैदिकांनी भगवान बुद्धांना नास्तिक म्हटले. आजच्या आधुनिक युगामध्ये ज्याप्रमाणे ईश्वरवाद फोफावला आहे, प्राचीन काळी तो याप्रमाणे नव्हता. या युगामध्ये जो ईश्वराचे अस्तित्व नाकारतो तो नास्तिक आणि जो स्वीकारतो तो आस्तिक ठरतो. परंतु भगवान बुद्धांची नास्तिकतेची व्याख्या याप्रमाणे कधीच नव्हती. मज्झिम निकायाच्या साल्लेख सुत्तामध्ये भगवान बुद्धांची उपासकांना दहा पापांचा त्याग करायला सांगीतले आहे. (ज्या उपदेशाला आपण बुद्धांचा उपासक होण्यापुर्वीची तयारी म्हणु शकतो..) त्यामध्ये दहावा पाप आहे नास्तिकता... भगवान बुद्धांनी नास्तिकता या पापाचा त्याग करण्याचा उपदेश आपल्याला केला आहे. परंतु याठिकाणी नास्तिकता म्हणजे आत्मा व ईश्वर यांचे अस्तित्व नाकारणे नव्हे.. तर दानाचे फळ नाही, चांगल्या व वाईट कर्मांचे फळ नाही, अंतिम सत्यापर्यंत पोहोचलेला कोणी विद्वान नाही ही नास्तिक मान्यता किंवा मिथ्या दृष्टी होय... एकुणच मिथ्या दृष्टी हा नास्तिकतेचा समानार्थी शब्द होय.


      भगवानांचा धर्म हा तर्कवादावर नाही तर अनुभुतीवर आधारीत आहे, त्यांनी तर्कवादाला साफ नाकारले आहे कारण तर्काने काहीच सिद्ध होऊ शकत नाही.. पण बरे वाईट अनुमान मात्र करता येतात आणि त्यातील सर्व गोष्टी सत्यच असतील याची निश्चीतपणे कोणी हमी सुद्धा देऊ शकत नाही. भगवान बुद्धांनी आपल्या अनुभुतीने धर्माचे अध्ययन केले आणि अनुभुतीनेच जगातील सर्व धर्मांना (निसर्गाच्या नियमांना) जाणले. आणि तेच जगाला सांगीतले कि हे जग कोणत्याही ईश्वरी शक्तीच्या जोरावर चालत नाही, जगामध्ये अनेक गोष्टी घडतात त्यामध्ये ईश्वराचा हात असतो. हे बुद्धांनी स्पष्टपणे नाकारले आहे. (वाचा : विभिन्न वाद सुत्त, अंगुत्तर निकाय, खंड ३) परंतु त्यांचा मात्र असा सिद्धांत आहे कि मनुश्य एखाद्या विशिष्ट मार्गाने गेल्यावर अनेक प्रकारच्या ॠद्धीबळांना प्राप्त करु शकतो. जे सामान्य मानवांसाठी अशक्य असतात. तसेच बुद्धांनी एका कर्मसिद्धांताची अनुभुती केली त्याच्यानुसार प्रत्येक व्यक्तीला त्याच्या बऱ्या वाईट कर्माचे फळ मिळते. दान करण्याचे फळ मिळते इत्यादी.... परंतु अजित केसकंबल हा तर्कवादी होता, त्यामुळे त्याच्या बुद्धीची जिथपर्यंत मर्यादा होती तिथपर्यंतच तो विचार करु शकत होता. याच कारणाने तो धर्माला (निसर्गाच्या नियमांना) जाणु शकला नाही. आणि त्याच्यानुसार सगळे तत्वज्ञानी एकाच माळेचे मणी आहेत आणि अंतिम सत्यापर्यंत पोहोचलेला कोणि विद्वान नाही. अर्थात निर्वाण प्राप्त केलेला कोणता जीव अस्तित्वात नाही आणि तिथपर्यंत जाण्याचा कोणता मार्गसुद्धा अस्तित्वात नाही. चांगल्या - वाईट कर्माचे फळ नाही, दानाची प्रशंसा मुर्ख करीत असतात. हे अजितचे मत होते. हे सर्व सिद्धांत त्याने मांडले ते केवळ या कारणाने तो नास्तिक ठरत नाही तर हे सर्व सिद्धांत त्याने केवळ स्वतःच्या तर्काच्या आधारावर मांडले, अनुभुतीच्या नाही, आणि एखादी व्यक्तीने जर त्याला सांगीतले कि आयुष्यमान हि अमुक अमुक गोष्ट जे तु सांगत आहेस ती गोष्ट चुकिची आहे, हे मी स्वतःच्या अनुभवावरुन जाणले तरी तो त्यावर विश्वास ठेवीत नसे कारण त्याचा तर्क तिथपर्यंत पोहोचत नसे..


      एकुणच, केवळ ईश्वराला नाकारले म्हणुन नव्हे तर माझ्या बुद्धीला जे पटते तेच सर्व सत्य आणि बाकि असत्य ह्या त्याच्या विचारसरणी मुळे तो नास्तिक ठरतो. शिवाय धम्माच्या दृष्टीने तो नास्तिक ठरण्यासाठी आणखीही अनेक कारणे आहेत.

      हटवा
  2. वेदकाळापासुन आजपर्यंत सुद्धा प्रत्येक परंपरेची आस्तिक आणि नास्तिकतेची व्याख्या वेगवेगळी आहे. जसे वैदिक परंपरे प्रमाणे जो वेदप्रामाण्य नाकारतो तो नास्तिक आणि जो वेदप्रामाण्य स्वीकारतो तो आस्तिक. म्हणुनच वैदिकांनी भगवान बुद्धांना नास्तिक म्हटले. आजच्या आधुनिक युगामध्ये ज्याप्रमाणे ईश्वरवाद फोफावला आहे, प्राचीन काळी तो याप्रमाणे नव्हता. या युगामध्ये जो ईश्वराचे अस्तित्व नाकारतो तो नास्तिक आणि जो स्वीकारतो तो आस्तिक ठरतो. परंतु भगवान बुद्धांची नास्तिकतेची व्याख्या याप्रमाणे कधीच नव्हती. मज्झिम निकायाच्या साल्लेख सुत्तामध्ये भगवान बुद्धांची उपासकांना दहा पापांचा त्याग करायला सांगीतले आहे. (ज्या उपदेशाला आपण बुद्धांचा उपासक होण्यापुर्वीची तयारी म्हणु शकतो..) त्यामध्ये दहावा पाप आहे नास्तिकता... भगवान बुद्धांनी नास्तिकता या पापाचा त्याग करण्याचा उपदेश आपल्याला केला आहे. परंतु याठिकाणी नास्तिकता म्हणजे आत्मा व ईश्वर यांचे अस्तित्व नाकारणे नव्हे.. तर दानाचे फळ नाही, चांगल्या व वाईट कर्मांचे फळ नाही, अंतिम सत्यापर्यंत पोहोचलेला कोणी विद्वान नाही ही नास्तिक मान्यता किंवा मिथ्या दृष्टी होय... एकुणच मिथ्या दृष्टी हा नास्तिकतेचा समानार्थी शब्द होय.


    भगवानांचा धर्म हा तर्कवादावर नाही तर अनुभुतीवर आधारीत आहे, त्यांनी तर्कवादाला साफ नाकारले आहे कारण तर्काने काहीच सिद्ध होऊ शकत नाही.. पण बरे वाईट अनुमान मात्र करता येतात आणि त्यातील सर्व गोष्टी सत्यच असतील याची निश्चीतपणे कोणी हमी सुद्धा देऊ शकत नाही. भगवान बुद्धांनी आपल्या अनुभुतीने धर्माचे अध्ययन केले आणि अनुभुतीनेच जगातील सर्व धर्मांना (निसर्गाच्या नियमांना) जाणले. आणि तेच जगाला सांगीतले कि हे जग कोणत्याही ईश्वरी शक्तीच्या जोरावर चालत नाही, जगामध्ये अनेक गोष्टी घडतात त्यामध्ये ईश्वराचा हात असतो. हे बुद्धांनी स्पष्टपणे नाकारले आहे. (वाचा : विभिन्न वाद सुत्त, अंगुत्तर निकाय, खंड ३) परंतु त्यांचा मात्र असा सिद्धांत आहे कि मनुश्य एखाद्या विशिष्ट मार्गाने गेल्यावर अनेक प्रकारच्या ॠद्धीबळांना प्राप्त करु शकतो. जे सामान्य मानवांसाठी अशक्य असतात. तसेच बुद्धांनी एका कर्मसिद्धांताची अनुभुती केली त्याच्यानुसार प्रत्येक व्यक्तीला त्याच्या बऱ्या वाईट कर्माचे फळ मिळते. दान करण्याचे फळ मिळते इत्यादी.... परंतु अजित केसकंबल हा तर्कवादी होता, त्यामुळे त्याच्या बुद्धीची जिथपर्यंत मर्यादा होती तिथपर्यंतच तो विचार करु शकत होता. याच कारणाने तो धर्माला (निसर्गाच्या नियमांना) जाणु शकला नाही. आणि त्याच्यानुसार सगळे तत्वज्ञानी एकाच माळेचे मणी आहेत आणि अंतिम सत्यापर्यंत पोहोचलेला कोणि विद्वान नाही. अर्थात निर्वाण प्राप्त केलेला कोणता जीव अस्तित्वात नाही आणि तिथपर्यंत जाण्याचा कोणता मार्गसुद्धा अस्तित्वात नाही. चांगल्या - वाईट कर्माचे फळ नाही, दानाची प्रशंसा मुर्ख करीत असतात. हे अजितचे मत होते. हे सर्व सिद्धांत त्याने मांडले ते केवळ या कारणाने तो नास्तिक ठरत नाही तर हे सर्व सिद्धांत त्याने केवळ स्वतःच्या तर्काच्या आधारावर मांडले, अनुभुतीच्या नाही, आणि एखादी व्यक्तीने जर त्याला सांगीतले कि आयुष्यमान हि अमुक अमुक गोष्ट जे तु सांगत आहेस ती गोष्ट चुकिची आहे, हे मी स्वतःच्या अनुभवावरुन जाणले तरी तो त्यावर विश्वास ठेवीत नसे कारण त्याचा तर्क तिथपर्यंत पोहोचत नसे..


    एकुणच, केवळ ईश्वराला नाकारले म्हणुन नव्हे तर माझ्या बुद्धीला जे पटते तेच सर्व सत्य आणि बाकि असत्य ह्या त्याच्या विचारसरणी मुळे तो नास्तिक ठरतो. शिवाय धम्माच्या दृष्टीने तो नास्तिक ठरण्यासाठी आणखीही अनेक कारणे आहेत.

    उत्तर द्याहटवा