शुक्रवार, २५ एप्रिल, २०१४

प्रतित्य समुत्पाद म्हणजे काय...? (भाग १ : प्रतित्य समुत्पादाची व्याख्या)


प्रतित्य समुत्पाद म्हणजे काय....? स्वतःला बौद्ध म्हणुन मिरविणाऱ्या अनेकांकडे या प्रश्नाचे उत्तर राहत नाही. तर ज्यांनी प्रतित्य समुत्पाद हे नाव यापुर्वी ऐकले असेल तर ते सांगतील कि प्रतित्य समुत्पाद हा बौद्ध धर्माचा अतिशय महत्त्वाचा सिद्धांत आहे जो आत्मा आणि ईश्वर यांचे अस्तित्व नाकारतो. याच्यापुढे कशाचीही माहीती राहत नाही.



प्रतित्य समुत्पाद हा सखोल ब्रह्मांडाच्या उत्पतीचे उत्तर देणारा एकमेव सुत्र आहे, तो कोरा दार्शनिक सिद्धांत नाही तर ती प्रत्यक्ष अर्हंत सम्यक संबुद्ध भगवानांची अनुभूती होती.


प्रतित्य समुत्पाद हा पुनर्जन्माच्या चक्राचे वैज्ञानीक विश्लेशन करणारा सम्यक संबुद्धांनी स्वतः अनुभव केलेला सिद्धांत आहे जो त्यांनी सांगीतलेल्या मार्गावर चालुन आपल्याला सुद्धा अनुभवता येतो.

सामान्यांना वाटते कि भगवान बुद्ध आत्मा, ईश्वर, पुनर्जन्म, इ. अंधश्रद्धा पसरविणाऱ्या गोष्टींना मानीत नव्हते. अशी अनेकांची समजुत आहे त्यामुळे त्यांच्यासाठी या लेखाच्या सुरुवातीलाच सांगु इच्छितो कि महान पाली टीकाकार आचार्य बुद्धघोष यांनी पट्ठानप्पकरणकथा ग्रंथामध्ये लिहिले आहे की,,



हीच ती महत्वपूर्ण बुद्ध तत्वज्ञानाची कसोटी आहे ज्यामुळे नित्यावाद, नित्य, ध्रुव पदार्थाचे गवेषक ह्या नित्यावादाची साथ सोडतात, कारण भगवान गौतम बुद्धांनी आपल्या धर्मात ईश्वरासाठी आणि आत्म्यासाठी कुठलेच स्थान ठेवले नाही. तरी तो पुनर्जन्म आणि कुशल, अकुशल कर्माच्या विपाकाला मानतो.



भगवान बुद्धांच्या धर्माचा वापर इतरांच्या श्रद्धास्थानांना (देवांना?) शिव्या देण्यासाठी वापर करणाऱ्या लोकांनी हे आचार्य बुद्धघोषांचे हे वचन नेहमीच लक्षात ठेवावे.
भगवान बुद्ध ईश्वर मानीत नाहीत, आत्मा मानीत नाहीत परंतु पुनर्जन्म मानतात, त्याचा कर्मसिद्धांत मानतात. अनेकांना असे वाटेल कि पुनर्जन्म म्हणजे कसलाही वैज्ञानीक आधार नसलेली एक अंधश्रद्धा आहे. किंवा काहींना असे वाटेल कि भगवान गौतम बुद्धांच्या (विज्ञानवादी?) चरित्र्यात त्यांची निंदा करणाऱ्यांनी (भटांनी?) केलेली भेसळ आहे. परंतु तसे काही नाही. तुम्हाला पडलेल्या प्रश्नांची उत्तरे या लेखमालिके मधुन मिळतीलच परंतु हा लेख संपुर्ण श्रद्धेने वाचा कारण यात काहीच अंधश्रद्धा नसुन भगवान गौतम बुद्धांनी आपले अनुभव आपल्याला सांगीतले आहेत. त्या सिद्धांतांचा आपण सुद्धा त्या मार्गावर चालुन अनुभव करु शकतो.


भगवान गौतम बुद्धांच्या काळातील श्रमण आणि ब्राह्मणांध्ये मुख्यतः २ प्रकाराची मते होती. १. शाश्वतवादी आणि २. उच्छेदवादी.

शाश्वतवादी : शाश्वतवादी मताचे लोक मानीत असत कि, आत्मा हा शाश्वत, नित्य, ध्रुव, अमर आहे. शरीर मेल्यानंतर तो दुसऱ्या देहात प्रवेश करतो. आणि अशा प्रकारे आत्म्याच्या संसरणाद्वारे पुनर्जन्म होत असतो..

उच्छेदवादी : तर दुसरी कडे उच्छेदवादी समजत असत कि आत्मा हा चार महाभूतांपासुन बनलेला आहे, १. पृथ्वी, २. आप, ३. तेज, ४. वायू. शरीरनाशानंतर ते सर्व घटक आपापल्या घटकामध्ये जाउन मिळतात आणि मग काहीच शिल्लक राहत नाही. त्यामुळे पुनर्जन्म नाही असा त्यांचा समज होता.


परंतु भगवान बुद्धांचा सिद्धांत हा दोघांच्याही मध्यम आहे. ना त्यांचा आत्म्यावर विश्वास आहे ना पुनर्जन्माला विरोध. भगवान गौतम बुद्ध आत्मा मानीत नाहीत, परंतु पुनर्जन्म मानतात तो कशाचा....? याचे उत्तर आपल्याला प्रतित्य समुत्पाद देते. वर सांगीतलेली शाश्वतवादी आणि उच्छेदवादी मते केवळ पुर्वकथन ऐकिवावर आणि काल्पनिक अनुमानांवर आधारीत होती. त्यांना कसलाही आधार नव्हता. ना ती अनुभवता येत होती. परंतु भगवानांचा प्रतित्य समुत्पाद मात्र अनुभवता येतो.


प्रतित्य समुत्पाद आपल्याला चार आर्यसत्याचे दर्शन करवितो. पहिले आर्यसत्य म्हणजे जगात दुःख आहे, हे आता सर्वमान्य आहे. परंतु दुसरे आर्यसत्य म्हणजे दुःखाची कारणे कोणती ..? हा प्रश्न विचारल्यावर अनेक लोक सांगतात कि, परिक्षेत कमी मार्क पडणे, मासीक पगार महिनाभर न पुरणे, प्रेयसी - प्रियकर सोडुन जाणे, इत्यादी... परंतु हे मुख्य कारण नव्हे. सर्व जगात आजारपण, मरण, शोक, रडणे, दुःख, उदासीनता यांचे अखंड साम्राज्य आहे. परंतु या सर्वांचे मुळ कारण काय आहे..? तर याचे सरळ आणि सोपे उत्तर जन्म. जन्म आहे म्हणुनच या सर्व गोष्टी घडत असतात.
जन्म कशामुळे घडतो.? जन्म अविद्येमुळे होतो... जन्माचे मुळ कारण अविद्या आहे.



अविद्या असल्याने संस्कार होत असतात. संस्कार असल्याने विज्ञान होते. विज्ञान असल्याने नामरुप होत असतात. नामरुप असल्याने षडयातन होत असते. षडयातन असल्याने स्पर्श होत असतो. स्पर्श असल्याने वेदना होत असते. वेदना असल्याने तृष्णा होत असते. तृष्णा असल्याने उपादान होत असते. उपादान असल्याने भव होत असते. भव असल्याने जन्म होत असतो. जाति असल्याने जरा, मरण, शोक, रडणे, चिंतीत होणे होत असते. अशा प्रकारे सर्व दुःख समूहाचा उदय होत असतो, यालाच प्रतित्य समुत्पाद म्हणतात.





त्या अविद्येला संपूर्णपणे हटविल्याने आणि नष्ट केल्याने संस्कार होत नसतात. संस्काराचा निरोध केल्याने विज्ञान होत नसते. विज्ञानाचा निरोध केल्याने नामरुप होत नसते. नामरुपाचा निरोध केल्याने षडायतन होत नसते. षडायतनाचा निरोध केल्याने स्पर्श होत नाही. स्पर्शाचा निरोध केल्याने वेदना होत नाही. वेदनेचा निरोध केल्याने तृष्णा होत नाही. तृष्णेचा निरोध केल्याने उपादान होत नसते. उपादानाचा निरोध केल्याने भव होत नाही. भवाचा निरोध केल्याने जन्म होत नाही. जन्माचा निरोध झाल्याने ना म्हातारपण, ना आजारपण, ना मरण, ना शोक, ना रडणे, ना ओरडणे, ना दुःख करणे. अशा तऱ्हेने या अविद्येला हटविल्याने संपुर्ण दुःखातुन मुक्ती मिळते..



आर्य श्रावक प्रतित्य समुत्पादाचा सिद्धांत चांगल्या प्रकारे समजतात..


तो पुर्वांत सामान्यांच्या लक्षात राहत नसतो., कि जी भुतकाळात होतो, मी भुतकाळात नव्हतो, मी भुतकाळात काय होतो, मी भुतकाळात कसा होतो, मी भुतकाळात काय होऊन काय झालो...?


त्याला अपरांत सुद्धा समजत नाही., कि मी भविष्यात होणार कि होणार नाही, भविष्यात काय होईन, भविष्यात कसा होईन, भविष्यात काय होऊन काय होणार आहे..

तो प्रत्युत्पन्न म्हणजे वर्तमानाला घेउन सुद्धा संशय करीत नाही. मी आहे, मी नाही, मी काय आहे, मी कसा आहे, माझा जीव कोठुन आला आहे, आणि कोठे जाणार आहे...?



अविद्येत खितपत पडलेला दुष्ट मनुष्य पाप धर्मात पडुन दुःखपुर्ण जीवन जगत असतो. महान परमार्थापासुन हात दुर जातो परंतु आर्य श्रावक विद्येला जाणित पाप धर्मापासुन स्वतःला वाचवित आनंदाने विहार करतो.


प्रतित्य समुत्पादाचा विषय हा खुप मोठा असल्याने तो अनेक लेखांमध्ये विभागुन एका लेखमालिके द्वारे आपल्या पुढे मांडण्यात येईल. या लेखामध्ये प्रतित्य समुत्पादाची व्याख्या समजावुन सांगीतली पुढील लेखात या जन्माला (दुःखाला) कारणीभुत घटकांबद्दल थोडक्यात माहीती पाहुया....



सर्व जीव सुखी होवोत
सर्वांना हिताचा मार्ग सापडो...



सदर पुस्तक प्राप्त करण्यासाठी फोटोवर क्लिक करा...



See Also :
चरिया पिटक मराठी [EBook Download]

नव-बौद्धांवर वाढत चाललेला अजीत केसकंबलाच्या पंथाचा प्रभाव : धोक्याची घंटा..

भगवान बुद्धांचा धम्म निराळा आहे.. (धम्मगुण - नक्की वाचा)

सोमवार, १४ एप्रिल, २०१४

चरिया पिटक मराठी.....







चरिया पिटक हे नाव तसे सामान्य वाचकांसाठी अपरीचीतच, परंतु पिटक हे नाव वाचताच धर्माच्या संबंधी आहे याची जाणीव होते. या पुस्तकाच्या नावाचा अर्थ होतो अर्थ होतो बोधीसत्वाच्या जीवनचर्या. भगवान गौतम बुद्धांनी त्यावेळी बुद्धत्वाची प्राप्ती केली नव्हती ते बोधीसत्वच होते. तो बराच मोठा कालावधी आहे, परंतु भगवान सारीपुत्राला आपल्या पुर्वजन्माच्या चर्यांबद्दल या पुस्तका मध्ये सांगतात कि त्यांनी कशा प्रकारे दहा पारमिता पूर्ण केल्या.

चरिया पिटकाचे तिपिटकातील स्थान शोधा...


हे पुस्तक वाचकांच्या स्वाधीन करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आजच्या काळात धम्म साहित्य लिहिने, छापणे, विकणे याला लोकांनी आपला धंदाच बनविला आहे. मराठी इंटरनेट विश्वात धम्म साहित्याची कमतरता लक्षात घेता आमच्या संघाने मोफत धम्म सहित्य उपलब्ध करुन देण्याचा कार्यक्रम सुरु केला आहे. त्याच कार्यक्रमाचे एक पाउल म्हणजे चरिया पिटक मराठी नावाचे पुस्तक आम्ही तुमच्यासाठी घेउन आलो आहोत. हे पुस्तक प्रकाशीत करताना बऱ्याच लोकांचे कळत - नकळत सहकार्य लाभले त्या सर्वांचे आभार....

साधू साधू साधू .....

सर्व जीव सुखी होवोत
सर्वांना हिताचा मार्ग सापडो..





सदर पुस्तक प्राप्त करण्यासाठी फोटोवर क्लिक करा...