सोमवार, २३ सप्टेंबर, २०१३

भगवान बुद्धांचा शीलमार्ग......

मनुष्याच्या नितीवान जीवन जगण्यात शीलांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. बुद्ध भगवंतांनी मनुष्याला श्रेष्ठ व सदाचारी बनविण्यासाठी, त्याला नितीवान जीवन जगण्यासाठी शिलमार्गाचा शोध लावला......


भगवान बुद्धांच्या संघाची विभागणी चार प्रकारात होते...


१. गृहस्थ - गृहीणी
२. उपासक - उपासिका
३. श्रामणेर - श्रामणेरी
४. भिक्खु - भिक्खुणी

ह्या चारही प्रकारात शिलांची विभागणी वेगवेगळी केली आहे. गृहस्थ आणि गृहीणींकरीता पाच शील आहेत, उपासक आणि उपासिकेसाठी आठ शील तर श्रामणेर आणि श्रामणेरींकरींना दहा शिलांचे पालन करावे लागते.


श्रामणेर म्हणजे : शिकणारा भिक्खु,, ज्याचे वय वीस वर्षांपेक्षा कमी आहे. श्रामणेर हा एक परिव्राजक असतो.... बौद्ध उपासक सुद्धा काही काळापर्यंत श्रामणेर ची दीक्षा घेऊ शकतो...


पंचशील

१. पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि
२. अदिन्नादाना वेरमणि सिक्खापदं समादियामि
३. कामेसु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि
४. मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि
५. सुरा-मेरय-मज्ज पमादठ्ठाणा वेरमणि सिक्खापदं समादियामिअष्टशील

३. अब्रह्मचरिय वेरमणि सिक्खापदं समादिया मि

६. विकालभोजना वेरमणि सिक्खापदं समादिया मि
७. नच्च-गीत-वादित-विसुक-दस्सन वेरमणि सिक्खापदं समादियामि
८. माला-गंध-विलेपान-धारण-मंडन-विभुसनठाणा वेरमणि सिक्खापदं समादियामि


९. उच्चासयना महासयना वेरमणि सिक्खापदं समादियामि
१०. जातरुप-रजत-पटिग्गहन वेरमणि सिक्खापदं समादियामि
१. मी प्राणी हत्येपासुन अलिप्त राहीन
२. मी चोरी करणार नाही
३. मी मिथ्याचारापासुन अलिप्त राहीन
४. मी खोटे बोलणार नाही.
५. मी मद्यपान आणि इतर नशाजन्य पदार्थांपासुन अलिप्त राहीन


अष्टशील

३. मी ब्रह्मचर्येचे पालन करेन

६. मी विकाल वेळी (दुपारी 12 नंतर) जेवन ग्रहण करणार नाही.
७. मी नृत्य, गीत, संगीत आणि इतर करमणुकीच्या साधनापासुन दुर राहण्याचे शील ग्रहण करतो.
८. मी माळ, सुगंधीत द्रव्ये आणि इतर अलंकारांपासुन दुर राहण्याचे शील ग्रहण करतो.


९. मी जमीनीपासुन उच्चस्थानावर झोपणार नाही.
१०. मी सोन्याचांदीचे दागीने घालणार नाही.ही आहेत दहा शिल... याती प्रथम पाच शील गृहस्थाने पाळावयाची असतात, तर आठ शील उपासकाने आणि दहा शील श्रामणेराने पाळावयाची असतात.

अष्टशील म्हणताना तिसऱ्या शीलाच्या म्हणजेच कामेसु मिच्छाचारा च्या ऐवजी अब्रह्मचरिय वेरमणि हे शील ग्रहण करावे.

दर अष्टमी, पोर्णीमा आणि अमावस्येला गृहस्थाने अष्टशीलांचे पालन करावे.
शीलाचे पालन जेवढे अधिक तेवढा अधिक आनंद मिळतो.


शीलग्रहण करणे चांगले का मानले जाते?

1. त्यामुळे व्यक्ती सुखी जीवनाकडे वाटचाल करतो.

2. तो दुसऱ्याचा द्वेष करीत नाही.

3. शील ग्रहण करणारी व्यक्ती पुर्णत्वप्राप्त केलेली असते.

4. तो सार्वांचा चांगला मित्र असतो.

शील ग्रहण न केल्यामुळे कोणते परिणाम होतील

१. व्यक्ती क्रुर बनतो.

२. व्यक्ती गुन्हेगारी प्रवृत्तीचा होऊ शकतो

३. कोणी त्याच्यावर प्रेम करणार नाही, त्याच्याशी एकनीष्ठ राहणार नाही.

४. तो दुसऱ्याना व स्वतःशी क्लेषदायी असेल.

५. विद्वान व्यक्ती त्याच्याशी मैत्री करणार नाहीत.


शीलाची उपासना कशी करावी?

सुरुवातीला काही महत्त्वाच्या पायर्या शील ग्रहण करण्यासाठी उपयोगी आहेत.

१. एकावेळी सर्व शीलाची उपासना जर शक्य नसेल तर क्रमाक्रमाने पाच शीलाची उपासना वाढवावी.


२. जर दररोज पंचशील ग्रहण करणे शक्य नसेल तर आठवड्यातुन एक दिवस निवडावा व त्यादिवशी नियमीत शील ग्रहण करावे.


सामान्यतः जगातील बौद्ध पाचही शीलाचे पालन करतात. त्यामुळे त्यांच्या कुटुंबातील सर्व व्यक्ती सुखी व समाधानी असतात. प्रत्येक कुटुंब जर सुखी व समाधानी असेल तर तो समाज सुखी व समाधानी होईल. समाज सुखी झाला तर सर्व जग सुखी होईल..


त्यामुळे नितीवान जीवन जगण्यासाठी, जीवनात सुखी होण्यासाठी शीलांचे पालन करण्याचा प्रयत्न करा..


पुढच्या दोन भागात आपण भिक्खु - भिक्खुणीच्या विनयांबद्दल माहीती घेऊया...


मंगल मैत्री
सदर पुस्तक प्राप्त करण्यासाठी फोटोवर क्लिक करा...See Also :


१. बुद्ध पुजा : पाली (Buddha Vandana in Pali)

२. बौद्ध पुजा आणि त्याबद्दल निर्माण होणारे गैरसमज

३. Buddha Vandana : English

४. बुद्ध वंदना : मराठी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा