बुधवार, १३ सप्टेंबर, २०१७

पुस्तक परिचय : भगवान बुद्धांची धम्मदेसना


भगवान बुद्धांची धम्मदेसना हे पुस्तक आपल्या ब्लॉगवर लेखन करणारे पियुष खोब्रागडे यांनी लिहिलेले असून ते विजयादशमीला प्रकाशित होत आहे. आधुनिक लेखकांद्वारे अनेक विषयांना पूर्वी योग्य प्रकारे न हाताळल्या गेल्यामुळे मराठी बौध्द समाजामध्ये ज्या विषयांसंबंधी अज्ञान किंवा चुकीची मान्यता प्रस्थापित झाली आहेत्या पैकी अनेकांच्या बाबतीत सदर पुस्तकामध्ये विस्तृतपणे विश्लेषण करण्यात आले आहे. त्यामुळे आपल्यापैकी प्रत्येकानेच हे पुस्तक अवश्य वाचावे.



हे पुस्तकाचे मुख्य कव्हर नाही...




            
पुस्तकाची सुरवात बुध्दधम्म आणि संघाच्या मुलभूत ओळखीसहच करण्यात आलीज्या त्रिरत्नांच्या बाबतीत सुध्दा बरेच समज गैरसमज समाजामध्ये पसरले आहेतत्यांना सुयोग्य स्पष्टीकरणा दवारे समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. पुस्तकाच्या सुरुवातीला"भगवान दीपंकर बुद्ध आणि बोधीसत्त्व सुमेध" यांची कथा सांगण्यात आली आहेजेणेकरून ज्याद्वारे नंतर स्पष्ट केलेली बोधिसत्व संकल्पना समजण्यासाठी कोणत्याही प्रकारची अडचण यायला नको. यामध्ये सर्व दहा पारमितांचे तसेच बोधिसत्वांच्या सर्व प्रकाराचे योग्य स्पष्टीकरण संबंधित जातक कथा आणि बोधिसत्वांच्या चर्यांच्या सहायाने समजावून सांगितला आहे.

            यानंतर बुध्दधम्म आणि संघाची अनुस्मृती यांच्यातील प्रत्येक शब्दांचा अर्थ तसेच त्यांच्यातून निर्माण होणाऱ्या वाद विवादांचे स्पष्टीकरण देण्यात आले आहेत्यानंतर आलेले "निर्वाण प्राप्तीचा आर्य अष्टांगिक मार्ग" हे प्रकरण इतरांच्या तुलनेत अतिशय लहान आहेकदाचित नाविन्यपूर्ण पुस्तक लिहिण्याच्या प्रयत्नात लेखकाने अनेक वेळा प्रकाश टाकण्यात आलेल्या ह्या विषयावर जास्त लिहिण्याचे टाळले असे दिसते. तरी सुध्दा अनेक माध्यमांतून टीकेचा विषय ठरणाऱ्या "सम्यक समाधी" ह्या विषयावर आपली मते मांडली आहेत. त्यांतंतर आलेले "बुद्धांच्या मार्गात आस्तीकाता आणि नास्तिकता नाही" हे प्रकरण सर्वात महत्वाचे आहेयामध्ये केवळ बुध्द समकालीन किंवा वर्तमानकालीन आस्तिक किंवा नास्तिक दर्शनाच्या बाजू मांडून त्यांच्यापासून भगवान बुद्धांचा मार्ग कशाप्रकारे वेगळा आहे हेच सांगितले नसून त्यांचे विभिन्न पैलूआचार - विचारमार्गइत्यादींचे तुलनात्मक स्पष्टीकरण देऊन भगवान बुद्धांनी उपदेश केलेला विशुध्दिचा खरा मार्ग समजाविला आहे.

            जगाच्या इतिहासामध्ये भगवान गौतम बुध्द हेच प्रथम मानव होतेज्यांनी वर्णव्यवस्था आणि जातीव्यवस्था नाकारीत मानवाला मानसिक,  सामाजिक आणि राजकीय आदी प्रकारच्या गुलामगिरी मधून मुक्त केले. तरी सुध्दा काही लोकांनी त्यांच्या अज्ञानामुळे किंवा त्यांच्या कमी आकलन शक्तीमुळे धम्माचे योग्य प्रकारे आकलन न करता आल्यामुळे भगवान बुद्धांवर सुध्दा ते वंशवादी व जातीवादी असल्याचा आरोप अनेक माध्यमातून केलेला आणि आणि तसा अपप्रचार सुध्दा चालविला आहे.त्याचा प्ररीपूर्ण सामाजार "भगवान बुद्धांच्या मार्गात जातीभेद नाही" ह्या प्रकरणामध्ये घेण्यात आलेला आहे. तसेच पूर्वीच्या परंपरेमध्ये हीन जातीचे किंवा अस्पृश्य म्हणून हिणविल्या गेलेल्यांनी भगवान बुद्धांच्या धम्माने दिलेल्या आधारामुळे जो धर्मापराक्रम केला त्यांच्या गौरवशाली इतिहासाबद्दल सुध्दा सदर प्रकरणामध्ये अत्यंत चांगल्या प्रकारे समजावून सांगितले आहे. तर यानंतर आलेल्या "भगवान बुद्धांची अहिंसा" या प्रकरणामध्ये अहिंसेच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकण्यात आलेला आहे.

            सदर पुस्तकामध्ये मराठी किंवा भारतीय बौध्द समाजाला अत्यंत संभ्रमावस्थेत नेऊन सोडणाऱ्या "महायान" ह्या विषयावर सुध्दा अगदी मुद्देसूद स्पष्टीकरण देत संबंधित विषयावरील प्रचलित गैरसमजांना नष्ट करीत महायानाच्या बाबतीत थोडक्यात प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहेवाचकांनी सर्व पूर्वग्रह बाजूला ठेऊन योग्य प्रकारे त्याला समजून घेतले तर निश्चितच फरक जाणवेल. "परित्राण अर्थात रक्षण तसेच पूजा" हा बौध्द परंपरेतील अत्यंत महत्वाचा असा घटक आहेतरी सुध्दा त्याचे आकलन करता आले नसल्याने त्याविषयी बनलेल्या चुकीच्या मान्यतेमुळे अनेकजण यावर अन्याय्य टीका करीत असतातसदर पुस्तकात त्यांचेही योग्यप्रकारे स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला आहे.

            मनुष्याच्या मनामध्ये दडलेल्या अमुल्य खजिन्याला बाहेर काढण्याचा मैत्रीकरुणाउपेक्षा व मुदिता ह्याचार तत्वावर आधारित मार्ग अर्थात "चतुर्ब्रह्मविहाराची" सुध्दा थोडक्यात ओळख करून दिली गेली आहेतर शेवटच्या प्रकरणामध्ये भारतातील बौध्द समाजापुढील प्रश्न व आव्हाने तसेच त्यांना कशाप्रकारे सोडवायला पाहिजे यावर चर्चा करण्यात आली आहे. आणि शेवटी सुत्तपिटकातील गृहस्थांसाठी उपयोगी सुत्तांचे मराठी भाषांतर सुध्दा देण्यात आले  आहे.

            एकूणच २३४ पानांच्या ह्या पुस्तकामध्ये बौध्द धम्माच्या विविध अंगांचे योग्य प्रकारे स्पष्टीकरण देण्यात आले आहे - ज्याद्वारे मराठी बौध्द समाज संभ्रमावस्थेत आहे. तसेच स्वतःच्या कमी आकलन शक्तीमुळे बौध्द धम्मावर विविध माध्यमांतून दिका करणाऱ्या लोकांच्या अनेक टीकांचा योग्य तो समाचार सुध्दा घेण्यात आला आहे. मराठी बौध्द समाजाला जास्त परिचित नसणाऱ्या बोधिसत्व संकल्पना (ज्या विषयावर स्वतःच्या कमी आकलन शक्ती किंवा कट्टर मान्यतेमुळे टीका सुध्दा करतात)चतुर्ब्रह्मविहार यांच्या सारख्या विषयावर प्रकाश टाकलेला आहे. पुस्तकाची भाषा अत्यंत चांगली असून त्यामुळे पुस्तक वाचतांना उत्सुकता निर्माण होते. पुस्तकामध्ये अनेक ठिकाणी अनुवादांचा सुध्दा वापर करण्यात आला आहे. त्यांची भाषा सुध्दा अतिशय सुंदर आहे. हे पुस्तक विविध विषयांना पाहण्याचा वेगळ्या प्रकारचा दृष्टीकोन प्रदान करते.  भारतीय बौध्द समाजाची परिस्थिती पाहून निश्चितच असे मत बनते किहे पुस्तक प्रत्येकांनी वाचायलाच हवे. 



ज्पुस्ताकाच्या संदर्भात मनोगत वाचण्यासाठी क्लिक करा..



पुस्तकाचे नाव : भगवान बुद्धांची धम्मदेसना 

एकूण पृष्ठे : २२६
पुस्तकाची किंमत : १५०/-
लेखकाचे नाव : पियुष खोब्रागडे, ब्रम्हपुरी. ८०८०१८७१९६
प्रकाशक : संबोधी प्रकाशन, नागपूर..


सदर पुस्तक आपण सर्वांनी एकदा अवश्य वाचावे, त्यासाठी जर आपण प्रकाशन पूर्व त्याबद्दल नोंदणी केली तर ते आपल्याला १५०/- ₹ मध्ये मिळेल. तसेच जर आपल्याला ते पुस्तक आवडले नाही तर आपले पैसे परत करण्याची लेखक हमी देतो. त्यासाठी आपण वर दिलेल्या लेखकाच्या मोबाईल नं वर संपर्क साधू शकता किंवा त्या संदर्भात ब्लॉगवर मेसेज पाठवू शकता.




३ टिप्पण्या:

  1. जय भिम सर मला पुस्तक हवे . कसे मिळू शकेल ते सुचवावे

    उत्तर द्याहटवा
  2. जयभीम साहेब मी दशरथ संध्यान आपणास विनंती करतो,की मला आपले पुस्तक पाहिजे आहे .त्यासाठी काय करावे लागेल..भगवान बुध्दांची धम्मदेसणा

    उत्तर द्याहटवा