मंगळवार, १७ डिसेंबर, २०१३

प्राचीन बौद्ध राजे.... (भाग २ : राजा प्रसेनजीत ~ १)

प्रसेनजीत हा कोसल देशाचा राजा होता, कोसल हे राष्ट्र मगध देशाच्या उत्तरेला वसलेले होते, त्यावेळी बिंबीसार हा मगध देशाचा राजा होता. श्रावस्ती हे कोसल देशाच्या राजधानीचे शहर होते. बिंबीसार हा प्रसेनजीतच्या बहिणीचा नवरा होता, प्रसेनजीतची बहिण हि बिंबीसार राजाची मुख्य पत्नी होती. प्रसेनजीत हा वैदिक धर्माचा अनुयायी होता, तो खुप मोठे मोठे यज्ञ करायचा. तरीसुद्धा तो श्रमणांचा मान ठेवायचा. त्याच्या राजधानी मध्ये अनाथपिंडिक ज्याचे खरे नाव सुदत्त होते त्याने भगवान बुद्ध व भिक्षुसंघासाठी जेतवन नावाचा मोठा विहार बांधुन दिला, भगवान बुद्धांनी आपले उपदेश सर्वात जास्त उपदेश श्रावस्ती येथील अनाथपिंडिकाच्या जेतवनातच केला.प्रसेनजीतची धम्मदीक्षा...एके समयी भगवान बुद्ध श्रावस्ती अनाथपिंडिकाच्या जेतवनात विहार करत होते, हे जेव्हा प्रसेनजीत राजाला समजले तेव्हा तो राजेशाही इतमामासह जेतवन विहारामध्ये गेला, आणि भगवंतांना हात जोडुन वंदन करीत तो म्हणाला,,

भगवान माझे हे क्षुद्र आणि अप्रसिद्ध राज्य आज खोरोखर भाग्यवान झाले आहे, कारण आपल्यासारखा सत्याचा शिक्षक, धर्मराज उपस्थित असताना या राज्यावर आपत्ती आणि संकटे कशी ओढवतील...? ज्या अर्थी आपल्या पवित्र चरणांचे मला दर्शन झाले त्या अर्थी आपल्या धर्मामृताचे प्राशन करु द्या.

भगवान म्हणाले,, ऐहिक संपत्ती ही अनित्य आणि नाशवंत आहे, ऐहिक जीवन जगणाऱ्या राजाचेही जीवन दुःखी असते परंतु पवित्र जीवन जगणाऱ्या सामन्य माणसालाही मनःशांती लाभते.


सुखाची हाव आणि अभिलाषा यांना कंटाळलेल्या राजाची स्थीती ओळखुन भगवान म्हणाले,,


हीन स्थितीत जन्माला आलेल्या लोकांनी धर्मपरायण मनुष्य बघितला तर त्यांना देखील त्याच्याबद्दल आदरभाव वाटतो ; मग राजाला त्याच्याबद्दल किती आदर वाटत असेल..? आणि म्हणुन मी माझा धम्म थोडक्यात सांगत असताना महाराजांनी माझे म्हणणे नीट लक्षपुर्वक ऐकावे व आत्मसात करावे.


• आपली बरी वाईट कृत्ये नेहमी सावलीप्रमाणे आपला पाठलाग करतात.

• सर्वात अधिक गरज करुणामय ह्रदयाची आहे.

• आपल्या प्रजाजनांना एकुलत्या एक मुलाप्रमाणे समजा., त्यांच्यावर जुलुम करु नका.

• आपल्या शरीराचा प्रत्येक अवयव आपल्या ताब्यात ठेवा.

• कुमार्मागाच्या विचारांचा त्याग करा व सन्मार्गाने जा.

• दुसऱ्यांना पायदळी तुडवुन स्वतः उच्चपदी चढू नका.

• दुःखीताना सुख द्या आणि त्याला आपला मित्र बनवा.

• तोंडपुजा करणाऱ्यांची गोड शब्दात केलेली स्तुती ऐकु नका.

• तपश्चर्येने स्वतःला क्लेश करुन घेण्यात काहीही लाभ नसते, म्हणुन धम्माचे चिंतन करा व सदाचरणाच्या नियमाचे महत्त्व ओळखा.

• दुःखाचे व अनिष्ट गोष्टींचे पर्वत आपल्याभोवती सर्वत्र उभे आहेत आणि खऱ्या धर्माचा विचार केल्यानेच त्यातुन आपली सुटका होऊ शकेल...

• सर्व शहाणे लोक शारीरीक सुखोपभोगांची उपेक्षा करतात. ते काम-वासनांचा तिरस्कार करतात आणि पवित्र जीवनांचा अवलंब करतात.

• झाडाला आग लागली तर त्याच्यावर पक्षी कसे राहु शकतील..? जिथे वासना असते तिथे सत्य राहु शकत नाही. हे ज्ञान ज्याला नाही त्या मनुष्याची विद्वान म्हणुन कितीही त्याची स्तुती होत असली तरी तो अज्ञच समजला पाहिजे.

• ज्याला हे ज्ञान झाले आहे, त्यालाच प्रज्ञा प्राप्त होते. ही प्रज्ञा प्राप्त करुन घेणे हा जीवनाचा एकमेव उद्देश आहे. तिच्याकडे दुर्लक्ष करणे म्हणजे जीवनाचे अपयशच होय.

• हे सत्य केवळ ॠषींसाठीच नसुन प्रत्येक मानव प्राण्याशी त्याचा संबंध आहे. ॠषींचीही अधोगती होऊ शकते, आणि सामान्य कुटुंबवत्सल माणसेही ॠषीपदाला पोहोचु शकततात.

• कामवासनेच्या भरतीपासुन सर्वांना सारखाच धोका असतो. सगळे जग त्या भरतीत वाहुन जाते, जो तिच्या भोवऱ्यात सापडतो त्याची सुटका होत नाही. परंतु प्रज्ञा ही नौका आहे आणि विचार हे तिचे सुकाणु. धम्म तुम्हाला असा आदेश देतो कि, तुमच्या या शत्रूंपासुन तुम्ही आपले संरक्षण करा.

• आपल्या कर्माचे परिणाम टाळणे आपल्याला अशक्य आहे, म्हणुन आपण सत्कर्मेच करावीत.

• आपल्या हातुन दुष्कृत्ये होऊ नये म्हणुन बपण आपले विचार तपासुन पहावे, कारण आपण जे पेरतो तेच आपल्याला मिळते.

• प्रकाशातुन अंधाराकडे आणि अंधारातुन प्रकाशाकडे जाणारे मार्ग असतात. अंधारातुन दाट अंधाराकडे आणि संधि प्रकाशातुन उज्वल प्रकाशाकडे जाणारे मार्गही असतात. सुद्य मनुष्याला अधिक प्रकाश पाहिजे असतो, म्हणुन तो प्रकाशाचाच उपयोग करील. तो सत्य ज्ञानाच्या प्राप्तीसाठीच प्रगती करत राहील.

• सद्वर्तनाने आणि बुद्धीचा उपयोग करुन आपले खरे श्रेष्ठत्व दाखवा.

• मन उदात्त करा आणि निश्चित ध्येयावर निष्ठा असु द्या. सद्वर्तनाच्या धर्म नियमांचे उल्लंघन करुन नका, आणि तुमचा आनंद बाह्य वस्तुंवर अवलंबुन न ठेवता तुमच्या स्वतःच्या मनावर अवलंबुन ठेवा.


भगवान बुद्धाची अमृतवाणी राजाने अत्यंत आदराने ऐकली आणि अंतःकरणात साठवली, आणि तो भगवान बुद्धांचा उपासक झाला...


क्रमशः


सदर पुस्तक प्राप्त करण्यासाठी फोटोवर क्लिक करा...बौद्ध धर्मानेच उत्कर्ष होणार आहे...

प्राचीन बौद्ध राजे.... (भाग १ : राजा बिंबीसार)

सम्राट अशोक (भाग १ : शंका निरासन)

श्रमणफळ सुत्ताचा मराठी अनुवाद (राजा अजातशत्रुची धम्मदीक्षा)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा