गुरुवार, १२ डिसेंबर, २०१३

प्राचीन बौद्ध राजे.... (भाग १ : राजा बिंबीसार)


बिंबीसार हा मगध देशाचा राजा होता. वयाच्या पंधराव्या वर्षी त्याचा राज्यभिषेक झाला. बिंबीसार राजाची राजधानी राजगृह होती तर त्याच्या पित्याचे नाव महापद्म असे होते. बिंबीसार हा शिशुनाग वंशाचा पाचवा राजा होता. त्याने कोसल देशाची राजकन्या (प्रसेनजीतची बहीण) कोसल्यादेवी सोबत लग्न केले होते.मगधचे राज्य हे पुर्वीपासुनच संपन्न राज्य होते. येते वाहणाऱ्या बारमाही नद्यांमुळे शेतील योग्य पाणीपुरवठा झाल्याने धनधान्याची मुबलकता राहत असे. मगध राष्ट्राच्या शेजारी कोसल, अंग आणि वज्जी ही बलवान राज्ये होते., त्याचप्रमाणे मगधसुद्धा बलवान व्हावे अशी बिंबीसाराची महत्त्वकांक्षा होती.


बिंबीसाराने लिच्छवी राजकन्येशी विवाह केला आणि तिच्यापासुन हल आणि विहल हि दोन मुले झाली. लिच्छवी राजकन्येशी लग्न करताना त्याने चेटक राजाला सयेनाग नावाचा हत्ती व अठरा पदरी सोन्याची माळ दिली. त्यानंतर भद्र देशाच्या खेत्रा आणि चौथी राणी विदेह देशाची राजकन्या होती.बिंबीसार राजाची प्रशासन व्यवस्था अतिशय चोख होती. तो एक शिस्तप्रिय आणि उत्कृष्ट प्रशासक होता, गुन्हेगारांना तो कधीच क्षमा करीत नसे. बिंबीसाराच्या कारकिर्दीत कलेचा खुप प्रसार झाला होता, त्याचप्रमाणे शिक्षणाचाही प्रसार झाला होता. मगध साम्राज्याचा खरा पाया घालणारा बिंबीसार राजा होता.

बोधीसत्त्वासोबत भेट


एकदा सिद्धार्थ गौतम कपिलवस्तुवरुन राजगृह येथे आले होते, त्यावेळी सिद्धार्थ पांडव टेकडीच्या पायथ्याशी लहानशी झोपडी तयार करुन निवास करीत होतात, एकदा बिंबीसाराने सिद्धार्थाला शहरातुन फिरताना बघितले. सिद्धार्थ पांडव टेकडीवर गेला जायला निघाला होता, सिद्धार्थाला बघुन अति आदराने आणि मोजक्याच लवाजम्यासह तो सिद्धार्थाकडे जायला निघाला. पर्वताप्रमाणे धिप्पाड असलेला राजा टेकडी चढुन गेला. त्याठिकाणी आसनस्थ असलेला तेजस्वी सिद्धार्थ गौतम त्याच्या दृष्टीस पडला. सिद्धार्थाचे शारिरीक सौंदर्य आणि चेहऱ्यावरील झळकणारी शांती पाहुन राजा बिंबीसार प्रेमपुर्वक आदरभावाने त्याच्याजवळ गेला आणि मोठ्या आदराने विचारपुस केली, मग राजा सिद्धार्थाजवळ बसला. आणि म्हणाला,,

माझी तुझ्या कुटुंबाशी फार मैत्री आहे, राज्यसत्तेचा उपभोग घेण्यापेक्षा संन्यासी जीवन जगण्याचा निश्चय तुझ्या मनात कसा आला.? दुसऱ्याने दिलेले अन्न ग्रहण करावे हे तुला शोभत नाही. तुला जर तुझ्या वडिलाचे राज्य नको असेल तर तु माझे अर्धे राज्य घे. धर्म, संपत्ती आणि सुख यांच्या नियमाला अनुसरुन वाग यामुळे मानवी जीवनाचा हेतु पुर्ण होतो. हे सर्व ऐकुन झाल्यावर सिद्धार्थाने आपल्या गृहत्यागाचे कारण सांगीतले त्यावर बिंबीसार म्हणाला, तुझे ध्येय पुर्ण झाल्यावर मला भेटण्याची कृपा कर...सम्यक संबुद्धासोबत भेट


सिद्धार्थ गौतम ज्ञान प्राप्त होऊन सम्यक संबुद्ध झाल्यावर राजगृहात आला होता. त्याने आपल्या धर्माचा उपदेश हजार जटील साधुंना दिला होता. ही सुवार्ता ऐकुन बुद्धाविषयी लोक चर्चा करु लागले होते. बिंबीसार राजाला भगवान बुद्ध शहरात आल्याचे समजले. बिंबीसाराने विचार केला कि, अत्यंत दुराग्रही अशा जटीलांना दीक्षा देणे हि साधी गोष्ट नव्हती. तो विद्वान सर्वज्ञानी लोकांना मार्गदर्शन करणारा देव व मनुष्यांचा गुरूच असला पाहिजे आणि सत्याचाच उपदेश करीत असला पाहिजे. अशा या माणसाचे दर्शन घेणे योग्य आहे असे बिंबीसार राजाला वाटले. बिंबीसार भगवान बुद्धांकडे गेला, अभिवादन करुन त्यांच्या जवळ बसला, भगवंतांनी त्याला उपदेश केला. भगवंतांचा उपदेश ऐकुन मगध राजा बिंबीसार म्हणाला,,

भगवंत पुर्वी राजपुत्र असताना माझ्या पाच इच्छा होत्या आता त्या पुर्ण झाल्या आहेत.१. पुर्वी मी राजपुत्र असताना मला राज्यभिषेक केला तर फार चांगले होईल, ती माझी इच्छा पुर्ण झाली.

. एखादा सम्यक संबुद्ध माझ्या राज्यात आला तर किती चांगले होईल. ती देखील इच्छा पुर्ण झाली आहे.

३. मला त्या भगवंताची सेवा करायला मिळाली तर चांगले होईल.

४. भगवंतांनी आपला धर्म शिकवावा

५. भगवंताचा धर्म मला कळावा.

अशा माझ्या पाच इच्छा होत्या व त्या पुर्ण झाल्या आहेत. भगवंतांनी मला आपला आजन्म शरण आलेलाउपासक म्हणुन स्वीकार करावा. भगवान बुद्धाने बिंबीसाराला बौद्ध उपासक बनविले. बिंबीसाराने बुद्धाच्या धर्माचा स्वीकार केला... राजा बिंबीसार भगवान बुद्धाचा श्रेष्ठ उपासक आणि धम्माचा प्रमुख आधार होता. उपासक झाल्यावर बिंबीसाराने भगवंतांना भिक्षु संघासोबत जेवनाचे आमंत्रण दिले व स्वतःच्या हाताने जेवन वाढले व त्याचे वेळूवन भगवान बुद्धांना व भिक्षुसंघाला दान दिले. 


बिंबीसार राजा हा बौद्ध धर्माचा निष्ठावान उपासक होता. त्याने बौद्ध धर्माचे धार्मिक उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे केले. तेव्हापासुन उपोसध पर्व सुरु झाले. भिक्षु संघ निरोगी राहावा म्हणुन त्याने अनेक उपाययोजना केल्या. बिंबीसार राजाचा डॉ. जीवक नावाचा राजवैद्य बौद्ध उपासक होता. तो अतिशय विद्वाण असा डॉक्टर होता.


एके दिवशी राजा बिंबीसाराने भगवान बुद्धाला पायाच्या नखाचा तुकडा मागितला व त्या नखाच्या तुकड्यावर राजाने एक स्तुप बांधला. राजघराण्यातील स्त्रीया दररोज संध्याकाळी स्वच्छ वस्त्रे परिधान करुन त्या स्तुपावर फुले चढवित आणि दीप प्रज्वलीत करीत.अशाप्रकारे धर्मप्रचाराची सुरुवात राजा बिंबीसाराने स्वतःच्या घरातुन केली त्यामुळे बिक्षु संघाला आणि धर्म प्रचाराच्या कार्याला अनुकुलता प्राप्त झाली. बुद्धाच्या काळातच बिंबीसार राजाने धर्मप्रचाराकरिता चांगलीच मदत केली........


सदर पुस्तक प्राप्त करण्यासाठी फोटोवर क्लिक करा...


See Also :

भगवान बुद्धांचा धम्म निराळा आहे... (धम्मगुण - नक्की वाचा)

मराठी धम्मपद

रोहीणीच्या वडिलांची धम्मदीक्षा...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा