शनिवार, १४ डिसेंबर, २०१३

बौद्ध धर्मानेच उत्कर्ष होणार आहे... ( भाग १ : मुलभूत फरक)आज जगात अनेक धर्म आहेत आणि त्या धर्माचे पाईक म्हणवणारेही अनेक आहेत, जवळपास जगातील प्रत्येक धर्म ईश्वराचे अस्तित्व मान्य करतो, एवढेच नव्हे तर आपण सांगीतलेला मार्ग हाच खराखुरा ईश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकमेव मार्ग आहे, दुसरा नाही. त्या धर्मांचा दुसरा पाया म्हणजे आत्मा. काही धर्म पुनर्जन्म मानतात तर काही धर्म एकच जन्म मानतात. आत्मा मानणारे धर्म म्हणतात,, तुम्ही मागील जन्मात केलेल्या कर्माचे फळ तुम्हाला पुढील जन्मात मिळेल, आणि जेव्हा ईश्वर भक्तीमुळे तुमच्या आत्म्याला मोक्ष प्राप्त होईल आणि तुम्ही जन्मजन्मांतराच्या फेऱ्यांमधुन मुक्त व्हाल. तर काही धर्म सांगतात तुम्हाला एकच जन्म मिळेल आणि त्या जन्मात तुम्हाला आम्ही सांगीतलेल्या कथीत ईश्वराची भक्ती करावी लागेल तेव्हाच तुम्ही स्वर्गात जाऊ शकाल, आणि आम्ही सांगीतलेल्या ईश्वराची भक्ती तुम्ही करणार नाही तर नरकात जाल. आता समजा पारशी धर्मानुसार झरत्रुष्ट नावाच्या ईश्वराने ह्या सृष्टीची निर्मीती केली, इस्लामनुसार अल्लाह आणि ख्रिस्ती धर्मानुसार यहोवा ने तर आता आपण यांच्यापैकी एक धर्म स्वीकारला तर त्याच्यानुसार आपण मेल्यानंतर स्वर्गात जाऊ शकतो परंतु बाकिच्या इस्लाम आणि ख्रिस्ती धर्मानुसार तो त्यांच्या धर्माचा नसल्या कारणाने नरकातच जाणार. अशा या धर्मांचा सिद्धांत आहे, यामध्ये खरे काय नि खोटे काय हे मी जाणत नाही, कारण मी अरहंत नाही .....
असो,, पण बुद्धाचा धर्म मात्र निराळा आहे. माझ्या धर्मात आत्मा आणि ईश्वराला कसलेही आणि कोणतेही स्थान नाही. बुद्धाचा धर्म केवळ ईश्वराचे आणि आत्म्याचे अस्तित्व नाकारतो यामुळेच निराळा नाही. जर तसे असते तर बाकिच्या निरिश्वरवादी धर्मांमध्ये, निरिश्वरवादी व अनात्मवादी असणाऱ्या लोकांमध्ये, धर्माला अफुची गोळी मानणाऱ्यां नास्तिकांमध्ये आणि बुद्धाच्या धर्मामध्ये फरक तो काय उरणार...?बुद्धाचा धर्म : निरिश्वरवाद, अनात्मवाद आणि अनित्यवाद
भगवान बुद्धांचा धर्म हा निरिश्वरवादी आहे त्यात ईश्वराला आणि आत्म्याला स्थान नाही.

सत्था देव मनुस्सानं बुद्धो भगवा ती!
प्राणीमात्रांनी, मनुष्यांनी व देवांनी सुद्धा तथागतास भगवान म्हटले आहे. अशा शुद्ध-संयमी भगवान बुद्धाने पट्ठान मध्ये केला आहे. ती अत्यंत सखोलनयाने परिपुर्ण देशना आहे. अभिद्धम्मपिटकातील सातवा ग्रंथ पट्ठान ह्या ग्रंथाबद्दल बुद्धघोष म्हणतात..
"हीच ती महत्त्वपुर्ण बुद्ध तत्वज्ञानाची खरी कसोटी आहे ज्यामुळे नित्यावाद, नित्य, ध्रुव पदार्थाचे ग्वेषक ह्या नित्यवादाचा साथ सोडतात. कारण भगवान बुद्धाने आपल्या धम्मात ईश्वरासाठी कोणतेच आणि कुठलेच स्थान ठेवले नाही, आणि न आत्म्यासाठी, तरी तो पुनर्जन्म आणि कुशल, अकुशल कर्माच्या विपाकाला मानतो, ह्या मान्यतेच्या मुळात बुद्ध धम्माचा 'प्रतित्य समुत्पाद' धम्माचा मुख्य सिद्धांत आहे."

तथागताला ह्या सत्याचे ज्ञान सम्यक संबोधीप्राप्तीच्या वेळीच झाले होते. ह्याचे प्रमाण त्रिपिटकात बरेच आहे. 


कोणता आहे तो नियम, ज्याचे ज्ञा भगवंतांनी सम्यक संबोधी प्राप्तीच्या वेळी जाणुन घेतले?

प्रतित्य समुत्पाद हा तो सखोल आणि सगळ्या ब्रह्मांडाच्या उत्पत्तीचे एकमेव सुत्र अहे. हा कोरा दार्शनिक सिद्धांत नाही. ही सम्यक सम्बुद्धाचे प्रत्यक्ष अनुभुती आहे. जर हा कोरा दार्शनिक सिद्धांतच असता तर तथागताला उपदेश करण्याची आवश्यका नव्हती. जर तसे असते तर तथागत सुद्धा अरस्तु, शेखर, नागार्जुन ह्यांच्याच समकोटीचे दार्शनिक असते. ते करूणेचे करूणाकार झाले नसते. त्यांच्या रूपाने मानवतेला आधार मिळाला आहे. खरोखरच तथागतांच्या करूणेचे ज्ञानमय परिणाम प्रतित्य समुत्पादच आहे.....


भगवान बुद्धाचे तत्त्वज्ञान वरती उंच शिखरावर जाऊन समता, समानता व बंधुत्व दर्शविते. निरिश्वरवाद, अनात्मवाद आणि अनित्यवाद हे बुद्धाच्या तत्त्वज्ञानाचे गाभा आहेत.....

भगवान बुद्ध हा साधासुधा मानवपुत्र असुन तो शेवटपर्यंत साधा मनुष्य राहिला व त्याने पददलित जनतेला आपल्या धर्माचे दरवाजे खुले केले, हे जगमान आहे, त्याने जन्मतः अलौकिक असण्याचा आव आणला नाही की अलौकिक चमत्कार करण्याची शक्ती आपल्या अंगी असल्याचे भासवुन जनतेला केव्हाही फसविले नाही,, बौद्ध धम्म हा वास्तववादी आहे. ईश्वरा आणि आत्मा यांच्यासारख्या काल्पनिक गोष्टींवर बुद्धाचा विश्वास नव्हता...

मनुष्य - मनुष्यांमधील संबंध जोडणारा धर्म...

जगातील बहुतेक धर्म ईश्वर व मनुष्य यांच्यातील संबंध जोडणारे आहेत. परंतु बुद्धाचा धर्म हा मानवा - मानवांमधील संबंध जोडणारा आहे, तुमचे वर्तन दुसऱ्या व्यक्तीसोबत कसे असायला हवे हेच बुद्धाचा धर्म शिकवतो....


बुद्धाच्या शिकवणुकीनुसार वर्तन केल्यास आजचे सर्व रामाजिक प्रश्न चुटकीसरशी सोडविता येतील यात शंका नाही.कोरा दार्शनिक सिद्धांत नव्हे... सर्वकाही अनुभवातुनच....

भगवान बुद्ध म्हणतात काल्पनिक अनुमानावर आधारलेला धर्म हा धर्मच नव्हे. बुद्धाच धर्म आत्मा आणि ईश्वर यांचे अस्तित्व नाकारतो, मग काही लोक म्हणतात कि, भगवान बुद्धाने जे आत्मा आणि ईश्वराचे अस्तित्व नाकारले आहे, ते त्याच्या अनुमानावरुन मग हा त्याचा काल्पनिक अनुमान ठरत नाही का..? जेव्हा जगातील सर्वच धर्म आत्मा व ईश्वराचे अस्तित्व नाकारतात आणि बुद्ध त्याचे अस्तित्व नाकारतात मग तो काल्पनिक अनुमान ठरत नाही का..? असे प्रश्न अनेक बौद्धोत्तर विचारत असतात त्यांना मला सांगायचे आहे कि,,
भगवंताने ज्या श्रेष्ठ धम्माचा उपदेश केला आहे, त्याचे सत्यत्व येथेच डोळ्यासमोर पाहता येते. कालांतराने नाही, तर जो धम्म आपले फळ ताबडतोब देतो, कोणीही ज्याचा अनुभव घ्यावा, जो निर्वाणाकडे घेऊन जातो हा सिद्धांत विज्ञानाद्वारे कोणत्याही शीलवंताला आणि प्रज्ञावंताला अनुभवुन पाहता येते.

भगवान बुद्धाने सांगीतलेले सर्व सिद्धांत अनुभवावरुनच सांगीतलेले आहेत, ते काल्पनिक नाहीत. भगवान बुद्धांनी ते त्यांच्या अनुभवातुनच सांगीतलेले आहेत, आणि आपल्यासारखा कोणताही व्यक्ती त्याचा अनुभव घेऊ शकतो....
बुद्ध हे आपलेच एक विकसीत रुप होय...


जगातील प्रत्येक ईश्वरवादी धर्माचे संस्थापक स्वतःला ईश्वराचा अवतार अथवा संदेष्टा सांगतात आणि आपलाच धर्म हा ईश्वराचा धर्म आहे असा दावा करुन मोकळे होतात, परंतु माझ्या धर्माचा संस्थापक व्हायला अगोदर स्वतःची योग्यता सिद्ध करावी लागते. त्याला सम्यक संबुद्धत्त्वाची प्राप्ती करावी लागते. सम्यक संबुद्ध कोणी ईश्वर नव्हे. नाही त्याचा अवतार अथवा दूत. सम्यक संबुद्ध आपल्या सारख्या मानवांचेच एक विकसीत रूप होय. कोणताही मानव महत्त्वकांक्षेने ते पद प्राप्त करु शकतो. आणि त्या पदापर्यंत पोहोचणारा मनुष्य सर्व विश्वाचे रहस्य जाणणारा बनतो. तो निर्वाण पदाची प्राप्ती करुन दुःख मुक्त होतो...
तथागत तर केवळ मार्गदर्शक आहेत...सर्व धर्मांमध्ये श्रेष्ठधर्म जर कोणता असेल तर तो भगवान बुद्धांचा धर्म होय. इतर धर्म निरर्थक आहेत. या धर्मात ईश्वराची भक्ती शिकवली जात नाही. या धर्मात आत्म्यालाही स्थान नाही. बौद्ध धर्माचा मुळ पाया दुःख हा आहे, आणि दुःखमुक्त होण्यासाठी ईश्वराची प्रार्थना करण्याऐवजी भगवान बुद्ध स्वतः दुःखमुक्तीचा मध्यम मार्ग सांगतात आणि त्या मध्यम मार्गावर चालुन मनुष्याने स्वतःच दुःखमुक्त व्हावे हा बुद्धाच्या धर्माचा उद्देश आहे.

आपल्यालाच प्रयत्न करायचा आहे, तथागत तर केवळ मार्गदर्शक आहेत...
कारण इतर धर्मसंस्थापकांप्रमाणे भगवान बुद्धांनी कधीच दावा केला नाही कि मी मोक्षदाता आहे माझ्या धर्मात आल्यावर मी तुम्हाला स्वर्गात जागा मिळवुन देईन. नाही माझ्या संघामध्ये आल्यावर तुम्ही दुःखमुक्त व्हाल. त्यासाठी तुम्हाला धम्ममार्गावर चालावे लागेल, त्यासाठी तुम्हाला कोणाचीही भक्ती करण्याची गरज नाही. बुद्धाने अहिंसेबरोबरच इतर अनेक गोष्टींचाही हिरीरीने पुरस्कार केला आहे. हि गोष्ट विसरता कमा नये. सामाजिक, बौद्धिक, आर्थिक व राजकीय स्वातंत्र्याचाही बुद्धाने पुरस्कार केलेला आहे. बौद्धधर्म हा नव्या जगाला सर्वतोपरी साजेसा असा धर्म असुन तो इहलोकीच मनुष्यमात्राला मुक्त करण्यास सर्वतोपरी समर्थ असाच धर्म आहे. म्हणुन मेल्याशिवाय स्वर्ग न दिसु देणाऱ्या इतर कोणत्याही धर्मापेक्षा तो केव्हाही श्रेष्ठच ठरणार.....सदर पुस्तक प्राप्त करण्यासाठी फोटोवर क्लिक करा...


See Also :


पुजेचा खरा अर्थ (नक्की वाचा)

सम्राट अशोक (भाग १ : शंका निरासन)

मराठी धम्मपद

भगवान बुद्धांचा धम्म निराळा आहे... (धम्मगुण - नक्की वाचा)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा