मंगळवार, ४ मार्च, २०१४

भगवान बुद्धांचा संघ ( भाग २ : भिक्खुणी आणि उपासिका संघ)


मागील भागत आपण भगवान गौतम बुद्धांच्या श्रावक भिक्खु संघाबद्दल थोडक्यात माहीती पाहिली. या भागामध्ये आपण भगवान गौतम बुद्धांच्या शासनात असलेल्या श्राविकांच्या भिक्खुणी आणि उपासिका संघाबद्दल माहिती घेऊ या....


भिक्खुणी संघ१. महाप्रजापती गौतमी : भगवान बुद्धांच्या श्राविका संघामध्ये सर्वात जास्त काळ विहार करण्याचा मान महाप्रजापती गौतमी यांना जातो. त्या क्षत्रीय शाक्यांचे महाराज शुद्धोधन यांच्या पत्नी होत्या.


२. खेमा : भगवान बुद्धांच्या भिक्खु संघामध्ये ज्याप्रमाणे धम्मसेनापती सारीपुत्र महाप्रज्ञावानांमध्ये अग्र आहेत, त्याचप्रमाणे भिक्खुणी संघामध्ये खेमा महाप्रज्ञावती श्राविकांमध्ये अग्र आहेत. त्यांचा जन्म मद्रदेशाच्या सिगाल नगरामध्ये झाला. त्या मगधराज बिंबीसार यांच्या पत्नी होत्या.


३. उप्पलवण्णा : भगवान बुद्धांच्या श्राविका संघामध्ये सर्वात ॠद्धीमती श्राविकांमध्ये उप्पलवण्णा अग्र आहेत. त्यांचा जन्म कोशल देशाच्या श्रावस्ती शहरातील उच्च कुळामध्ये झाला.


४. पटाचारा : भगवान बुद्धांच्या श्राविका संघातील विनयांचे पालन करणाऱ्या श्राविकांमध्ये पटाचारा अग्र आहेत. त्यांचा जन्म कोशल देशाच्या श्रावस्ती शहरातील उच्च कुळामध्ये झाला.


५. धम्मदिना : भगवान बुद्धांच्या श्राविका संघातील धर्म कथन करणाऱ्या श्राविकांमध्ये धम्मदिना अग्र आहेत. त्यांचा जन्म मगध देशातील राजगृहामध्ये झाला.


६. नंदा : भगवान बुद्धांच्या श्राविका संघातील ध्यानी श्राविकांमध्ये नंदा अग्र आहेत. त्यांचा जन्म शाक्य देशाच्या कपिलवस्तू शहरातील क्षत्रीय कुळात झाला. नंदा ही महाप्रजापती गौतमी यांची मुलगी होती.


७. सोणा : भगवान बुद्धांच्या श्राविका संघातील सर्वात प्रयत्नशील असलेल्या श्राविकांमध्ये सोणा अग्र आहेत. त्यांचा जन्म कोशल देशाच्या श्रावस्ती शहरामध्ये झाला.


८. बकुला : भगवान बुद्धांच्या श्राविका संघातील दिव्य दृष्टी असलेल्या श्राविकांमध्ये बकुला अग्र आहेत. त्यांचा जन्म कोशल देशाच्या श्रावस्ती शहरामध्ये झाला.


९. भद्दा कुण्डलकेसा : भगवान बुद्धांच्या श्राविका संघातील भगवानांनी उपदेश केलेल्या धर्माचा सर्वात लवकर अनुभव करणाऱ्या श्राविकांमध्ये भद्दा कुण्डलकेसा अग्र आहेत. त्यांचा जन्म मगध देशातील राजगृहामध्ये झाला.


१०. भद्दा कापिलानि : भगवान बुद्धांच्या श्राविका संघातील पुर्वजन्मांचे स्मरण करणाऱ्या श्राविकांमध्ये भद्दा कापिलानि अग्र आहेत. त्यांचा जन्म मद्रदेशाच्या सालनगरात झाला.


११. भद्दा कचाना : भगवान बुद्धांच्या श्राविका संघातील श्रेष्ठ प्रज्ञावती श्राविकांमध्ये भद्दा कचाना अग्र आहेत. त्यांचा जन्म शाक्य देशातील कपिलवस्तू शहरामध्ये झाला.


१२. किसा गोतमी : भगवान बुद्धांच्या श्राविका संघातील सर्वात रूक्ष चिवर धारण करणाऱ्या श्राविकांमध्ये किसा गोतमी अग्र आहेत. त्यांचा जन्म कोशल देशाच्या श्रावस्ती शहरामध्ये झाला.


उपासिका संघ१. सुजाता : भगवान बुद्धांच्या श्राविका संघातील सर्वप्रथम शरण येणाऱ्या उपासिकांमध्ये सुजाता अग्र आहेत. त्यांचा जन्म मगध देशातील उरुवेला (बुद्धगया) मध्ये झाला.


२. विशाखा : भगवान बुद्धांच्या श्राविका संघातील सर्वात श्रद्धावती उपासिकांमध्ये विशाखा अग्र आहेत. त्यांचा जन्म कोशल देशाच्या श्रावस्ती शहरामध्ये झाला.


३. खुज्जुत्तरा : भगवान बुद्धांच्या श्राविका संघातील सर्वात जास्त धम्माचे ज्ञान असणाऱ्या उपासिकांमध्ये खुज्जुत्तरा अग्र आहेत, त्यांचा जन्म वैत्स्य देशाच्या कौशाम्बी शहरात झाला. त्या एका दासीच्या पुत्री होत्या.


४. सामावती : भगवान बुद्धांच्या श्राविका संघातील मैत्री भावनेत विहार करणाऱ्या उपासिकांमध्ये सामावती अग्र आहेत. त्यांचा जन्म भद्रवती राष्ट्राच्या भद्रिका शहरात झाला.


५. नंदमाता : भगवान बुद्धांच्या श्राविका संघातील ध्यान करणाऱ्या उपासिकांमध्ये नंदमाता अग्र आहेत. त्यांचा जन्म मगध देशाची राजाधानी राजगृह शहरामध्ये झाला.


६. सुप्रवासा : भगवान बुद्धांच्या श्राविका संघातील सर्वात आनंददायी श्रद्धावती उपासिकांमध्ये सुप्रवासा अग्र आहेत. त्यांचा जन्म शाक्य देशाच्या कुंडीया गावात झाला..


७. सुप्रिया : भगवान बुद्धांच्या श्राविका संघातील रोगी श्रद्धावती उपासिकांमध्ये सुप्रिया अग्र आहेत. त्यांचा जन्म काशी देशाच्या वाराणसी शहरात झाला.


८. कात्यायनी : भगवान बुद्धांच्या श्राविका संघातील अति प्रसन्न उपासिकांमध्ये कात्यायनी अग्र आहेत त्यांचा जन्म अवंति देशाच्या कुरुरघर शहरात झाला.


सदर पुस्तक प्राप्त करण्यासाठी फोटोवर क्लिक करा...आम्हाला फेसबुकवर Follow करा

भगवान बुद्धांचा भिक्खु संघ

भगवान बुद्धांना स्त्रीद्वेष्टा म्हणणाऱ्या लोकांचे कोडे...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा