सोमवार, ११ नोव्हेंबर, २०१३

बुद्ध धम्म व काही प्रश्नोत्तरे : भाग २ (ध्यान भावना)



प्रश्न : बुद्धधम्मातील ध्यान भावना म्हणजे काय...?


उत्तर : भगवान बुद्धांच्या शिकवणुकीप्रमाणे ध्यान भावना म्हणजे शांती होय. मनाला मुद्देसुद वळणावर आणुन ठेवणे म्हणजे ध्यान भावना होय. ध्यान भावना हा एक मार्ग आहे तो स्वतःवर नियंत्रण ठेवुन मनाची एकाग्रता वाढवितो. वाईट विचारापासुन शुद्धीकरण करण्याचा तो मार्ग होय. राग, लोभ, द्वेष, मत्सर, अज्ञान, ईत्यादी मारविचारांपासुन परावृत्त होण्यासाठी हा मार्ग उपयुक्त आहे.



Tप्रश्न : मनाला प्रशिक्षण देण्याची आवश्यकता का आहे..?

उत्तर : भगवान बुद्धाच्या धम्माचे केंद्रबिंदु हे मानवाचे मन आहे. सर्व चांगल्या वाईट कार्य सुरुवातीला मनातुनच उत्पन्न होत असतात. मनच सर्व घटनांचे प्रमुख आहे, म्हणुन मन हे प्रथम प्रशिक्षित व शुद्ध असले पाहिजे. ध्यान भावना, मनाची शुद्धता बुद्धीसामर्थ्यासाठी आवश्यक आहे. जे ध्यान भावना करतात, त्यांना मनाच्या शुद्धतेविषयी लाभ प्राप्त होतात. विद्यार्थ्यांना सुद्धा त्यांचे गृहपाठ व अभ्यास करण्यासाठी मनाच्या एकाग्रतेची नितांत आवश्यकता आहे. एवढेच नव्हे तर ध्यान भावना हा सराव प्रत्येकाला त्याच्या जीवनात व कार्यात उपयुक्त आहे.



प्रश्न : ध्यान भावना किती प्रकारची आहे..?


उत्तर : साधारणतः ध्यान भावनेचे दोन प्रकार आहेत. १. समाधी ध्यान भावना आणि २. विपश्यना ध्यान भावना.


समाधी : समाधी ध्यान भावनेचे उद्देश मन एका विशिष्ट बिंदुवर केंद्रित करण्यासाठी आहे. भगवान बुद्धांची प्रतीमा गोलाकार किंवा रंगीत तबकडीवर एका ठिकाणी मन केंद्रित करतात. ध्यान करणारा व्यक्ती वरीलपैकी एक घटक निवडुन त्यावर मन केंद्रित करतो. जोपर्यंत समोरील घटक बपल्याला स्पष्ट जाणतो तोपर्यंत मन त्या विशिष्ट बिंदुच्या ठिकाणी केंद्रित करावे व हळुहळु डोळे बंद करावे. मनात दुसरे कोणतेही विचार आणु नयेत. डोळे मिटुन असलेल्या अवस्थेत त्याच घटकावर मन केंद्रित ठेवावे. अशा प्रकारे मन तात्पुरते एकाग्र करता येते व राम्ग, चिंता, अस्वस्थता, अतितृष्णा, शंका ह्या बाबीचे तात्पुरत्या स्वरुपात दमन करता येते.


विपश्यना : विपश्यना म्हणजे सत्यास्वरुपात व पुर्णपणे परिश्रमपुर्वक, सर्व बाबींविषयी सुक्ष्मदृष्टी प्राप्त करणे होय. सर्व बाबींविषयी जाणीवपुर्वक आकलन, त्या वस्तु ज्या सत्यास्वरुपात आहेत त्याच स्थितीत जान ठेवणे म्हणजे विपश्यना होय. उदा. जेव्हा ध्यानभावना करणारा डोळे मिटुन ध्यान करतो तेव्हा तो श्वासोच्छवासाचे काळजीपुर्वक निरीक्षण करतो. तो आत जाताना व बाहेर येताना हळुहळु मनशांत व स्वच्छ बनते नंतर ध्यान भावना करणारा. आपल्या मनातील विचारांचे निरीक्षण करु लागतो, व भावनांविषयी स्वरुपाविषयी अनिच्च लक्षणाविषयी विचार करु लागतो. तो श्वास आत व श्वास बाहेर जाताना त्याचे निरीक्षण करतो. श्वासोच्छ्वासातील जढ उतार जाणतो. अशाप्रकारे जेव्हा ध्यान भावना करणारा मनाची नैसर्गीक अवस्था जाणतो तेव्हा त्याचे मन सर्व बाबीपासुन मुक्त व स्वतंत्र असते. हा विपश्यना करण्याचा योग्य मार्ग होय.


सध्या बरेच लोक श्वास आत जाणे व बाहेर येणे ह्या बाबी जाणतात म्हणजे परिपुर्ण विपश्यना ही अत्यंत आवश्यक आहे. कोणत्याही सामान्य तथा असामान्य कृतीसाठी एकाग्रता व बुद्धीसामर्थ्य आवश्यक आहे. ते विपश्यनेतुन प्राप्त होते. योग्य ध्यान भावनेसाठी अनुभवी चांगल्या मार्गदर्शकाची आवश्यकता असते.



प्रश्न : मनसामर्थ्य व एकाग्रते शिवाय जर काम केले तर काय परिणाम होतील..?


उत्तर : जर मनसामर्थ्या अभावी व एकाग्रतेशिवाय काम केले तर त्यातुन निश्चित स्वरुपाची प्राप्ती होणार नाही. उदा. एखाद्या विद्यार्थ्याने एकाग्रतेशिवाय व मनसामर्थ्या शिवाय अभ्यास केला तर त्याचे स्मरण पाहिजे त्या स्वरुपात होणार नाही. येथे अभ्यासासाठी एकाग्रतेची भुमीका अत्यंत महत्त्वाची आहे. आकलन व सुक्ष्मदृष्टी हे कोणतेही कामात उपयोगात येणारी साधने आहेत.



प्रश्न : ध्यान भावनेचे फायदे कोणते...?


उत्तर : ध्यान भावनेचे अनेक फायदे आहेत. काही फायदे पुढीलप्रमाणे आहेत :

मनाला शांती प्राप्त करण्यास मदत मिळते. ध्यान भावना मनाला बळकटी आणण्यासाठी मदत करते व मनाला समर्थ बनविते. दैनंदिन जीवनात आत्मविश्वासपुर्वक मन कोणत्याही प्रश्नावर व अडचणीवर मात करण्यासाठी समर्थ बनते. मनाचा मानसिक विभाग ध्यान भावनेतुन धारदार बनतो, दडपण, चिंता व उत्कंठा ह्यापासुन मुक्त होतो. ध्यान भावनेमुळे आपले शरीर व सुदृढ मन वाढीसाठी ध्यान भावनेची मदत होते. मन शुद्धीकरणासाठी ध्यान भावनेची मदत होते. ध्यान भावनेमुळे मनात करूणेची, शांतीची वाढ होते.


द्वेष, लोभ, उत्कट इच्छा, स्वार्थीपणा, मत्सर इत्यादी बाबींपासुन ध्यान भावना मनास परावृत्त करते. सामान्य जीवनासाठी व सांसारिक प्रयत्नासाठी ध्यान भावनेचे वरील फायदे आहेत. थोडक्यात ध्यान भावनेचे फायदे जाणुन घेण्यासाठी व प्राप्त करण्यासाठी योग्य वातावरण, आत्मविश्वास, सातत्य व नियमीत सराव हा आवश्यक आहे.

चांगले सराव प्राप्त मन शाश्वत आनंददायी असते आणि ते विश्वातील सर्वांसाठी चिरस्थायी शांती देणारे आहे.



मंगल मैत्री.....

~ भंते डॉ. सी. फँनचँम


सदर पुस्तक प्राप्त करण्यासाठी फोटोवर क्लिक करा...




Read Also :

१. बुद्ध धम्म व काही प्रश्नोत्तरे : भाग १ (बुद्ध धम्म म्हणजे काय....?)

२. जयमंगल अष्टगाथा आणि त्यांच्या कथा (भाग ५ : जैन तिर्थक आणि अनैतिकतेचा आरोप)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा