शुक्रवार, २० सप्टेंबर, २०१३

धम्मदीक्षेचे महत्त्व : जन्माने कोणीही बौद्ध होत नसतो

मनुष्य जेव्हा भगवान बुद्धाच्या शिकवणीनुसार म्हणजेच धम्मानुसार जीवन जगण्याचा जेव्हा निश्चय करतो आणि शरणगमन करुन पंचशीलांचा स्वीकार करतो तेव्हाच तो बौद्ध बनतो.परमपुज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिनांक 24-05-1955 रोजी मुंबई येथे दिलेल्या भाषणात म्हटले होते कि, बुद्धधम्मात उपासकाला दीक्षा दिली जात नसे. याचा संघदीक्षेवर विपरीत परिणाम होतो. उपासकाच्या मनाची परिपुर्ण तयारी झालेली नसते, परंतु माझ्या धम्मात उपासकांनाही धम्मदीक्षा दिली जाईल. तत्पुर्वी धम्मदीक्षेवर मी एक पुस्तक लिहिणार आहे, ते पुस्तक प्रत्येकाला विकत घ्यावे लागणार आहे व त्या पुस्तकातील विचारलेली प्रश्नांची उत्तरे प्रत्येकाला द्यावी लागणार. तरच त्याला बुद्धधम्मात प्रवेश मिळेल. बुद्धधम्मात प्रवेश करण्यासाठी प्रत्येकाने शुभ्र वस्त्र परिधान केले पाहिजे.
यावरुन धम्मदीक्षेचे किती महत्व आहे हे लक्षात घ्यावे. एक सामाजिक संकेत म्हणुन बौद्ध दाम्पत्याच्या पोटी जन्म घेतल्याने म्हणजेच बौद्ध कुटुंबात जन्मलेल्या मुलामुलींना बौद्ध समजले जात असले तरी, कोणीही जन्माने बौद्ध होत नसतो. म्हणुन धम्मदृष्टीने पाहता केवळ बौद्ध कुटुंबात जन्म झाला आहे म्हणुन त्या मुलामुलींना बौद्ध समजले जाऊ नये. अर्थात त्यांच्यावर धम्माचे शुद्ध संस्कार अवश्य घडवावेत आणि सज्ञान झाल्यावर योग्यायोग्यतेचा विचार करुन ते धम्मदीक्षा घेण्यास तयार होतील अशी तयारी अवश्य करुन घ्यावी व त्यांचा धम्मदीक्षा समारंभ सार्वजनीक ठिकाणी अथवा विहाक़ात आयोजीत करणे आवश्यक आहे. या गोष्टीचे पालन आपण कटाक्षाने करायला हवे. या दीक्षेला धम्म संस्कार दीक्षा म्हणावे.
दुसरी गोष्ट म्हणजे ज्या अनेक कारणंनी भारतातुन बौद्ध धम्माचे उच्चाटन झाले, त्यातील एक कारण होते धम्मदीक्षेचा अभाव. या कारणामुळे पुन्हा बौद्ध धम्माची कधी काही हानी होऊ नये म्हणुन डॉ. आंबेडकरांनी लोप पावलेले धम्मदीक्षेचे म्हत्त्व पुन्हा प्रस्थापित केले...The Buddha and his Dhamma या ग्रंथात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ही गोष्ट चांगल्या प्रकारे स्पष्ट केलेली आहे. परंतु बौद्ध समाजाचे त्याकडे संपुर्ण दुर्लम्व झाले आहे, हि अत्यंत खेदाचीच नव्हे तर चिंतेची बाब सुद्धा आहे. जन्माने बौद्ध मानण्याच्या दुष्ट रुढीचे अधिकांश लोक शिकार बनले आहेत, यात काही शंका नाही. तर काही लोक नुसती धम्मदीक्षा घेतल्याने कोणी खरा बौद्ध होतो काय? अशा आत्मप्रौढीच्या अहंगंडाने ग्रासलेले दिसतात. खरे किंवा खोटे बौद्ध होणे हे ज्याचे त्याच्याच हातात आहे. जबरदस्तीने काही करता येत नाही. परंतु किमान लौकिक अर्थाने जाणीवपुर्वक कोणी धम्मदीक्षा घेतली तर अशी व्यक्ती निदान अन्य धर्मांच्या प्रभावापासुन दुर तरी राहील आणि आज नाहीतर उद्या तरी परिणामकारक बौद्ध जीवन जगण्यास प्रवृत्त होईल. म्हणुन लोकांना धम्मप्रभावापासुन दुर का ठेवावे?
कुटुंबा - कुटुंबातील इच्छुक तरुण - तरुणीस जर औपचारिकरित्या धम्मदीक्षा देऊन बौद्ध समाजाचे अधिकृत अंग बनविले नाही, तर मात्र काही काळातच बौद्ध धम्माला ओहोटी लागुन युवा पिढी इतर प्रचाराला आणि प्रभावाला बळी पडल्याशिवाय राहणार नाही हे निश्चित आणि गेल्या तीस वर्षांपासुन घडु लागले आहे आणि त्याचे दुष्टपरिणामसुद्धा दिसु लागले आहेत.


या गोष्टीची सर्व बौद्धसमजाजान गंभीरपणे दखल घ्यावी अशी आमची नम्र सुचना आहे.प्रतिज्ञा आपण करु या - जीवसृष्टी आहे असीम, ती भवसागर पार नेण्याची


प्रतिज्ञा आपण करु या - आहेत आपणात दोष असंख्य, ते नष्ट करण्याची


प्रतिज्ञा आपण करु या - आहेत सत्य अनंत, ती पुर्ण आकलण्याची


प्रतिज्ञा आपण करु या - भगवान बुद्धांचा अतुल्य मार्ग, तो संपुर्ण साध्य करण्याची


मंगल मैत्रीRead Also :


१. बुद्ध पुजा : पाली (Buddha Vandana in Pali)


२. बौद्ध पुजा आणि त्याबद्दल निर्माण होणारे गैरसमज३. Buddha Vandana : English४. बुद्ध वंदना : मराठी

1 टिप्पणी: