शनिवार, २६ जुलै, २०१४

आषाढ पौर्णिमेचे महत्व



भगवान बुद्धांच्या जीवनामध्ये प्रत्येक पौर्णिमेचे स्वतःचे एक वेगळेच महत्व आहे. परंतु आषाढ पौर्णिमेचा दिवस त्यांच्या जीवनामध्ये एक अतिमहत्वाचा दिवस आहे- कारण याच दिवशी




१. महामायेस गर्भधारणा 
२. बोधीसत्वाचे महाभिनिष्क्रम
३. धर्मचक्र प्रवर्तन






१. महामायेस गर्भधारणा :


भगवानांच्या जीवनातील हा प्रसंग अत्यंत महत्वाचा आहे. शुद्धोधन राजाची पत्नी महामाया हिला गर्भधारणा झाली. एका अर्थाने भविष्यातील बुद्धांचा जन्म महामायेच्या गर्भात झाला होता.

शेकडो वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. अमरावती नावाच्या संपन्न शहरामध्ये एका पिढीजात सदाचारी आणि श्रीमंत दाम्पत्याला सुमेध नावाचा मुलगा झाला. सुमेध शिक्षण घेत असतानाच त्याच्या पालकांचे निधन झाले. वयात आल्यावर तो परिव्राजक बनला. पुढे त्याची भेट भगवान दीपंकर बुद्ध यांच्यासोबत झाली. त्यावेळी भगवानांनी सांगितले कि, भविष्यात हा सुमेध सुद्धा बुद्धत्वाची प्राप्ती करून घेणार आहे. त्यानंतर सुमेधाने अनेक जन्म घेऊन पारमिता पूर्ण करून अनेक जन्म इंद्रपद, बोधीसत्व, ब्रह्मपद, इत्यादी पदे भुषवीत बुद्धपदाकडे वाटचाल केली आणि शाक्यांचे राजे शुद्धोधन आणि राणी महामाया यांच्या घरी आपला शेवटचा जन्म घेण्याचे ठरविले. एकदा निद्रावस्थेत असताना महामायेला स्वप्न पडले. स्वप्नात सुमेध नावाचा बोधीसत्व तिच्यापुढे प्रगट झाला आणि तिला म्हणाला – मी माझा शेवटचा पृथ्वीवर घेण्याचे ठरविले आहे. तू माझी माता होशील काय ....? महामायेने होकारार्थी उत्तर दिल्याबरोबर , स्वप्न तुटले आणि तिला जाग आली, अशा प्रकारे महामायेला गर्भधारणा झाली.





२. बोधीसात्वाचा गृहत्याग : बोधीसत्व सिद्धार्थाच्या गृहत्यागासंबंधी अनेक मते-मतांतरे आहेत. पारंपरिक पद्धतीने असे सांगितले जाते की, बोधीसात्वाने गृहत्याग मध्यरात्री कोणालाही न सांगता केला. पण त्यांनी गृहत्याग सर्वांच्या सोबत केला . या गोष्टीला त्रिपिटकातही आधार आहे. असो,, आपण यां मुद्याला बाजूला ठेवूया......

बोधीसत्वाने गृहत्याग केला याला बरेच लोक त्याचा बेजबाबदार पणा समजतात. खरच तसे होते काय....?


या गोष्टीच्या मुळापर्यंत जाताना आपल्याला समजून घ्यायला हवे कि, बोधीसात्वाला त्याच्या परिवाराला सोडून जाणे काही साधी आणि सोपी गोष्ट नव्हती. त्याने त्याच्या गृह्त्यागाच्या पूर्वी भरपूर विचार केला. आन त्याने त्याच्या परिवार आणि समाज यांच्यापैकी समाजाला निवडले. गृहत्याग करून त्यांनी बुद्धत्वाची प्राप्ती केली, दुःख मुक्तीचा मार्ग शोधला, त्यांनी जगाला करूणा शिकविली. त्यांनी त्यावेळी केलेली त्यागामुळे आपल्याला त्यांच्या शिकवणीचा आधार मिळाला, आपल्याला निर्वाणाचा मार्ग जाणता आला. कित्येक लोकांनी निर्वानाचे सुख प्राप्त केले, हे सर्व शक्य झाले ते बोधीसत्वाने त्यां वेळेस केलेल्या गृहत्यागामुळे . म्हणून बोधीसत्वाचे हे कृत्य बेजबाबदार पनाचे नव्हते तर अखिल विश्वाच्या कल्याणाकरीता केलेल्या त्यागाचे सर्वोत्कृष्ट उदाहरण होते.




३. पहिले धर्मचक्र प्रवर्तन : बोधीसत्वाने अनेक जन्म पारमिता पूर्ण करून बुद्धपदाकडे वाटचाल केली, त्यांनी मानवाच्या संपूर्ण दुःखमुक्तीच्या मध्यम मार्गाचा, निर्वाण प्राप्तीचा शोध लावला. ज्याचे सार चार आर्यसत्य यांच्यावर आधारलेले आहे, अशा धर्माचा त्यांनी शोध लावला. बुद्धत्व प्राप्तीनंतर भगवान बुद्धांनी काही दिवस उरुवेलाच्या वनात निर्वाण सुखाचा आनंद घेत घालविले. भगवान उपदेश करीत नाहीत हे पाहून, चिंताग्रस्त ब्रह्म सहम्पती ब्रह्म लोक सोडून भगवानांच्या समोर प्रगट झाला अंड हात जोडून भगवानांना म्हणाला – हे वीर, उठा, आपण संग्राम जिंकले आहात... आपला भार उतरला गेला आहे, ज्याप्रमाणे पर्वताच्या माथ्यावरून एखादा मनुष्य खालील लोकांकडे पाहतो. त्याचप्रमाणे आपण प्रज्ञेच्या शिखरावरून दुःखाच्या सागरात बुडालेल्या यां जगाकडे पहा.. ऋणमुक्त जगात विहार करा.. भगवान धर्माचा उपदेश करा.. हे सुगत, धर्मोपदेश करा, समजणारे सुद्धा मिळतील



भगवानांनी ब्रह्म सहम्पतीची विनंती ऐकून धर्माचा उपदेश करण्याचा निर्णय घेतला. त्यांचा हा धर्म गंभीर स्वरूपाचा होता. त्यामुळे सर्वप्रथम त्यांनी या धर्माचा उपदेश कोणाला करावा हा प्रश्न त्यांचं समोर पडला. त्यावेळी बोधिसत्व अवस्थेत असताना त्यांचे गुरु आलार कालाम आणि उद्दक रामापुत्र यांना शिकविण्याचा निर्णय त्यांनी घेतला. परंतु त्या दोघांचे निधन झाले असे त्यांना समजले. अशा वेलीग त्यांना सोडून गेलेली पाच परीव्राजकांची आठवण झाली आणि त्यांनी त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना असे समजले कि ते पाच परिव्राजक सारनाथ मध्ये आहेत. तेव्हा भगवान त्या परीव्राजाकांना उपदेश करण्याच्या उद्देशाने वाराणसीकडे गेले आणि त्यांना सारनाथ मधील ऋषीपतन च्या मृगदाय वनात त्या परीव्राजाकांना धर्माचा उपदेश केला, चार आर्यसत्य आणि आर्य अष्टांगिक मार्गाचा उपदेश केला... अशा प्रकारे त्यांनी पहिले धर्मचक्र प्रवर्तन केले......


या महत्वाच्या घटना आषाढ पौर्णिमेच्या दिवशी घडल्या, त्यामुळे या पौर्णिमेला बरेच महत्व प्राप्त झाले आहे, आषाढ पौर्णिमा हि पावसाळ्यात येते. त्यामुळे या पौर्णिमेपासून तीन महिने वर्षावास सुरु होतो. आपल्या सर्वांना आषाढी पौर्णिमा आणि वर्षावासाच्या हार्दिक मंगल कामना


सदर पुस्तक प्राप्त करण्यासाठी फोटोवर क्लिक करा...




३ टिप्पण्या:

  1. मला बुद्ध आणि त्यांच्या धम्म हे PDF मराठी फाईल पाहिजे

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. सुचने साठी धन्यवाद, आपल्यासाठी बुध्द आणि त्यांचा धम्म ह्या पुस्तकाची मराठी फाईल लवकरच उपलब्ध करून देण्यात येईल..

      हटवा
  2. या पौर्णिमेच्या महत्वाचे संदर्भ काय?

    उत्तर द्याहटवा