सोमवार, २ जून, २०१४

बोधीसत्वाचा धर्म कोणता......?
बोधीसत्व हे सामान्य मानव नसतात. सामान्यांना विचलीत करणाऱ्या, दुःखी करणाऱ्या किंवा आनंदी करणाऱ्या अनेक सामान्य गोष्टी ह्या बोधीसत्वाला विचलीत करु शकत नाही. त्यांचा आनंद सामान्यांसारखा कारणावर आधारीत नसतो, कारण कारणावर अवलंबुन असणारा आनंद हा अर्थातच अशाश्वत असतो. ते त्यांच्या मनाच्या सामर्थ्यावर सुखाची प्राप्ती करतात. बोधीसत्व सामान्य मानवाच्या मनावर असणारी बंधने तोडून निर्वाणाकडे वाटचाल करतात.

सामान्य मानवासारखे त्यांचे विचार संकुचीत नसतात. सामान्य मानवांमध्ये असणारी 'सांप्रदाया' सारखी संकुचीत बंधने सुद्धा त्यांच्यावर नसतात त्यामुळे ते हिंदु, बौद्ध, शीख, जैन, ख्रिश्चन यांच्यापैकी ते कोणत्याही सांप्रदायाचे नसतात. याठिकाणी 'बौद्ध' हा शब्द अनेकांना खटकला असेल, पण विचार करण्यासारखी गोष्ट म्हणजे भगवान गौतम बुद्धांनी आपल्य शिकवणीला कधीच 'बौद्ध धर्म' किंवा अनुयायांना 'बौद्ध' असे म्हटले नाही. मग काय म्हटले....? भगवानांनी आपल्या शिकवणीला धर्म (धम्म) म्हटले आणि अनुयायांना धार्मिक (धम्मिक).. जो विश्वव्यापी आहे, तो 'सांप्रदाया' सारख्या संकुचीत संकल्पनेच्या कक्षेत बसत नाही.

याअर्थी जगात केवळ दोनच धर्म आहेत. कोणते दोन....? १. सद्धर्म आणि २..अधर्म.

आणि हे दोन धर्म सुद्धा कोणत्याही सांप्रदायाच्या कक्षेत येत नाही. हिंदु, बौद्ध, जैन, शीख, इस्लाम, ख्रिश्चन या सांप्रदायातील लोक सुद्धा काही अधर्मी तर काही सद्धर्मी असतात.

धर्म आणि सांप्रदायातील मुळ फरक म्हणजे सांप्रदाय हा जन्माधारीत व्यवस्थेवर चालतो तर धर्म हा कर्माधारीत असतो. एखादा व्यक्ती कोणत्या सांप्रदायात जन्मला हे त्याच्या जन्मावरुन ठरते. कोणी हिंदु दांपत्याच्या घरी शीख होतो, इत्यादी ही जन्माधारीत व्यवस्था आहे. तो कोणत्या सांप्रदायाचा आहे हे त्याच्या जन्मावरुन ठरते. परंतु धर्माच्या बाबतीत तसे नाही. ती कर्माधारीत संकल्पना कोणी सद्धार्मिक किंवा अधार्मिक आहे हे त्याच्या चांगल्या
परमपुज्य दलाई लामांच्या विरुद्ध केला जाणारा प्रचार...या मुद्याची सुरुवात करण्या पुर्वी मी तुम्हाला काही सुचवु इच्छीतो - तुमचा जर कर्म सिद्धांतावर विश्वास असेल तर कृपया दलाई लामांची किंवा अन्य कोणत्याही विद्वानांची निंदा करु नका.

दलाई लामा हे ब्राह्मण आहेत. आता ब्राह्मण कोणाला म्हणावे, हे मला नव्याने सांगावे लागु नये. ब्राह्मण विद्वानाला म्हटले जाते, कृपया याला एखाद्या विशीष्ट समाजातील लोकांबद्दल वापरुन सांप्रदायीक रुप देऊ नका.. आणि ब्राह्मणांचा अपमान करणे, त्यांची निंदा हे फार मोठे पाप आहे. याबाबतीत एक गोष्ट सांगाविशी वाटते.


एक कोकालिक नावाचा भिक्खु होता त्याची भगवान गौतम बुद्धांवर नितांत श्रद्धा होती परंतु तेवढाच तो सारीपुत्र आणि महामोग्गलायन यांची निंदा करीत असे. तेव्हा भगवानांनी त्याला जवळ बोलावुन समजावुन सांगीतले कि, सारीपुत्र आणि महामोग्गलायन यांची निंदा करु नकोस, तो म्हणाला., भगवानांच्या प्रति माझ्या मनात खुप श्रद्धा आहे ; परंतु सारीपुत्र आणि महामोग्गलायन हे पापकर्माच्या आहारी गेले.

भगवानांनी दुसऱ्यांदा आणि तिसऱ्यांदाही समजावल्यावर कोकालिक भिक्खुने ते समजुन घेतले नाही, आणि तो निघुन गेल्यावर त्याची तब्येत बिघडली आणि त्याचा मृत्यु झाला.


तेव्हा भगवानांनी इतर भिक्खुंना सांगीतले कि सारीपुत्र आणि महामोग्गलायन यांच्याप्रती मनात वैरभाव ठेवल्यामुळे त्याचा जन्म पद्म नावाच्या नरकात झाला. त्यावेळी भगवान म्हणाले –


मानवाच्या जन्मासोबतच त्याच्या तोंडात एक कुऱ्हाड उत्पन्न होत असते. मुर्खपणाच्या, वाईटपणाच्या गोष्टी बोलत असता तो तिने स्वतःलाच तोडत असतो. जो निंदनीय आहे, त्याची प्रशंसा करीत असतो आणि जो प्रशंसेस पात्र आहे त्याची निंदा करीत असतो. तो तोंडाने पापकर्म करीत असतो, त्या पापामुळे त्याला कधीही सुख मिळत नसते.
ते दुर्भाग्य तर फार लहान आहे, जो जुगारात आपले सर्व धन गमावतो., सर्वात मोठे दुर्भाग्य तर हे आहे, की जो बुद्धाच्या प्रति काही अपराध करतो. काया, वाचा आणि मनाला पापात लावुन शेकडो, हजार, निर्बुद्ध, आर्य पुरुषांची निंदा करणारा, नरकात कुजत असतो..


- (संयुक्त निकाय ६:१:१०)

या कथेचा संदर्भ घेऊन यानंतर आपण आर्य पुरुषांची निंदा करणार नाही अशी आशा आहे.


दलाई लामा मे, २०१४ च्या अखेरीस सोमैय्या महाविद्यालय परीसर, विद्याविहार, मुंबई येथे गेले असताना त्यांनी हिंदु देवांना नमस्कार केला याचा संदर्भ घेऊन अनेक बऱ्या - वाईट प्रतिक्रीया आल्या.
महाराष्ट्रातील काही कट्टर सांप्रदायीक लोक जे दलाई लामांची जे निंदा करतात, त्यांना टिका करण्याची संधीच मिळाली असेल. तर काही मित्र म्हणाले - कि दलाई लामा हे भारताच्या आश्रयाला आहेत, त्यांना तिबेट मुक्त करायचा आहे म्हणुन इथल्या लोकांना विश्वासात घेण्यासाठी ते असे करीत आहेत. त्यांना मी असे सांगु इच्छितो की, दलाई लामांचे विचार सामान्यांसारखे संकुचीत नाही. ते बोधीसत्व आहेत, निर्वाणगामी आहेत, निर्वाणाकडे वाटचाल करीत, स्वार्था सारख्या विचारांचा त्यांनी केव्हाच पराभव केला आहे.

दलाई लामांनी जे काही केले हा त्यांचा धर्माचाच भाग आहे. कोणता आहे त्यांचा धर्म.....?


असीम करुणा, मंगल मैत्री आणि शांतीचा प्रसार हा त्यांचा धर्म आहे.

बोधीसत्वाचा मुख्य धर्म हा दहा भांगामध्ये विभागला आहे. कोणते दहा ... ?

• दान

• शील

• नैष्कर्म

• विर्य

• क्षांती

• सत्य

• अधिष्ठान

• मैत्री

• उपेक्षा...

या सर्वांचे पालन करणे हाच त्यांचा खरा धर्म आहे ...

भगवान गौतम बुद्ध जेव्हा बोधीसत्वच होते, त्यांनी बुद्धत्वाची प्राप्ती केली नव्हती. त्यावेळी त्यांनी सुद्धा याच धर्माचे पालन केले होते. या बद्दल चरिया पिटकात बोधीसत्वाच्या कथा सांगीतल्या आहेत...


सदर पुस्तक प्राप्त करण्यासाठी फोटोवर क्लिक करा...


You might like to read :

चरिया पिटक मराठी..... [Download Ebook]

मंगल मैत्री आणि करूणेचा शास्ता

बोधीसत्व सुमेध आणि भगवान दीपंकर बुद्ध..

नव-बौद्धांवर वाढत चाललेला अजीत केसकंबलाच्या पंथाचा प्रभाव : धोक्याची घंटा ... .


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा