भगवान बुद्ध लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
भगवान बुद्ध लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, १३ सप्टेंबर, २०१७

पुस्तक परिचय : भगवान बुद्धांची धम्मदेसना


भगवान बुद्धांची धम्मदेसना हे पुस्तक आपल्या ब्लॉगवर लेखन करणारे पियुष खोब्रागडे यांनी लिहिलेले असून ते विजयादशमीला प्रकाशित होत आहे. आधुनिक लेखकांद्वारे अनेक विषयांना पूर्वी योग्य प्रकारे न हाताळल्या गेल्यामुळे मराठी बौध्द समाजामध्ये ज्या विषयांसंबंधी अज्ञान किंवा चुकीची मान्यता प्रस्थापित झाली आहेत्या पैकी अनेकांच्या बाबतीत सदर पुस्तकामध्ये विस्तृतपणे विश्लेषण करण्यात आले आहे. त्यामुळे आपल्यापैकी प्रत्येकानेच हे पुस्तक अवश्य वाचावे.



हे पुस्तकाचे मुख्य कव्हर नाही...



मंगळवार, १३ मे, २०१४

मंगल मैत्री आणि करूणेचा शास्ता



सर्व देव आणि मनुष्यांना बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक मंगल कामना...
वैशाखी पौर्णिमेचे महत्व अनन्य साधारण आहे. याच दिवशी :

१. बोधीसत्व सिद्धार्थाचा जन्म झाला,
२. यशोधरेचा जन्म,
३. सिद्धार्थ - यशोधरेचा मंगल परिणय,
४. बोधीसत्व सिद्धार्थाला संबोधी प्राप्ती आणि

५. भगवान गौतम बुद्धांचे महपरिनिर्वाण वैशाखी पौर्णिमेलाच झाले म्हणुन या दिवसाला बुद्ध पौर्णिमा असे सुद्धा म्हणतात.



बोधीसत्वाने गृहत्याग केला याबद्दल काही टिकाकार अन्याय्य टिका करत असतात. आपल्या बायको, मुलाला आणि परिवाराला सोडुन संन्यास घेणे हा सिद्धार्थाचा बेजबाबदारीपणा होता काय?




सिद्धार्थाला आपल्या परिवाराला सोडुन संन्यास धर्म स्वीकारणे म्हणजे सोपी गोष्ट नव्हती. त्याच्यासमोर दोन पर्याय होते, एक म्हणजे त्याचा परिवार आणि दुसरा हे जग.. त्यापैकी त्याने दुसरा पर्याय निवडला. त्याने जगाला करुणा शिकवली. त्याने त्यावेळेस केलेल्या त्यागामुळे आज संपुर्ण विश्वाला त्याच्या तत्त्वज्ञानाचा आधार मिळालेला आहे. त्यामुळे सिद्धार्थाचे ते कृत्य बेजबाबदारपणाचे नव्हते तर मानवाच्या कल्याणा करिता केलेल्या त्यागाचे ते सर्वोत्कृष्ट उदाहरण होते.


आपण या लेखामध्ये भगवान गौतम बुद्धांच्या असीम करुणा, मंगल मैत्री आणि सहिष्णुता या गुणांबद्दल माहीती घेऊया.....


सेलो यथा एकघना वातेन समीरती, एवं निंदापसंसासु न समिञ्ज पण्डिता 


- (धम्मपद : ८१)



अर्थ : ज्याप्रमाणे शैल पर्वत वाऱ्याने हलत नाही, त्याचप्रमाणे विद्वान निंदा किंवा प्रशंसेने विचलीत होत नाही. 



या सुभाषिता प्रमाणेच भगवान बुद्धांचे व्यक्तीत्व होते. त्यांची मंगल मैत्री महासागराप्रमाणे अथांग तर सहिष्णुता हिमालयच्या सर्वोच्च शिखराप्रमाणे स्थीर होती. ज्याप्रमाणे हिमालयाला कितीही वादळांचा सामना करावा लागला तरी तो स्थीर राहतो आणि महासागरातुन कितीही पाणी काढले आणि त्यात टाकले तरी त्याला काहीच फरक पडत नाही, अगदी त्याचप्रमाणे भगवान बुद्धांची कोणी कितीही निंदा किंवा प्रशंसा केली तरी त्याने काहीच फरक पडत नव्हता., कोणी भगवानांची निंदा केली तेवढ्याने त्यांच्या मनात असलेली निंदकबद्दलची करूणा आणि मंगल मैत्री कमी होत नव्हती. याचे प्रमाण त्रिपिटकात बरेच आहे

सुत्तपिटकाची सुरुवात अशाच एका दृष्टांताने होते. दीघनिकाच्या ब्रह्मजाल सुत्तामध्ये सुप्रिय आणि भारद्वाज हे दोघे गुरु शिष्य भगवानांबद्दल चर्चा करीत असताना ब्रह्मदत्त हा भगवान बुद्धांची प्रशंसा करीत असतो तर सुप्रिय निंदा. यावर भगवान म्हणतात - भिक्खुंनो, कोणीही बुद्धाची, धर्माची किंवा संघाची कोणी प्रशंसा केली तर त्याने हुरळून जाऊ नका किंवा निंदा केली तर त्याच्यावर कोपु नका, त्याच्याशी वैरभावाने वागु नका, असे केल्याने स्वतःचीच हानी होते. याउलट जर तुमच्यावर अथवा बुद्ध, धर्म आणि संघावर जे आरोप केले आहेत त्याच्यामध्ये किती सत्यता आहे याची शहानिशा करा आणि तुमच्यात दोष असतील तर तत्काळ त्यांचा नाश करा. निंदकाला तुमच्या कल्याण मित्राप्रमाणे बघा.


अंबठ्ट सुत्तामध्ये अंबठ्ट नावाचा माणवक म्हणतो - श्रमण गौतम हा मुंडक, नीच, चांडाळ, ब्रह्माच्या पायातुन उत्पन्न झालेला आहे. एवढेच नव्हे तर त्याने शाक्यांवर सुद्धा अनेक आक्षेप घेतले. त्याच्या आरोपावर सम्यक संबुद्धांनी संयमाने अंबठ्टाच्या 'कण्हायण' गोत्राचा त्याला सांगताना सिद्ध केले की तो शाक्यांचे पुर्वीचे राजे अक्कोसक आणि दासी पुत्र 'कण्ह' चा वंशज आहे आणि त्याला गोत्रवाद, जातीवादाचा गर्व सोडण्याचा उपदेश केला.



जातित्थद्धो, धनत्थद्धो, गोत्तत्थद्धो च यो नरो, संञ्ञ्ति अतिञ्येति पराभवो मुखं


- पराभव सुत्त १४




अर्थ : जी व्यक्ती आपल्या जन्मजातीचा, धनसंपत्तीचा, गोत्राचा गर्व करते आणि त्याच अहंकाराने आपल्या इतर समाज बांधवांचा अनादर करते हेच तिच्या पराभवाचे कारण आहे.



वसल सुत्तामध्ये अग्नीपुजक भारद्वाज ब्राह्मण म्हणतो - हे मुंडक श्रमणा, तिथेच थांब, हे वृषला, हे चांडाळा तिथेच थांब पुढे येउ नकोस. अग्नीपुजक भारद्वाज ब्राह्मणाने केलेल्या निंदेने जराही विचलीत न होता, जराही क्रोध न करता भगवानांनी त्याला वृषल व्यक्तीचे लक्षण सांगीतले. जन्माने कोणीही विद्वान किंवा चांडाळ होत नाही, तो त्याच्या कर्मानेच होतो.


मागण्डिय सुत्तामध्ये, मागण्डिय परिव्राजक भगवानांची निंदा करताना म्हणाला - हा श्रमण गौतम मानवतेचा विनाशक आहे, तो हत्यारा आहे. मागण्डियाने केलेल्या निंदेने भगवानांनी जराही विचलीत न होता त्याला सदाचाराचा उपदेश केला, त्या उपदेशाने मागण्डिय परिव्राजक इतका प्रभावीत झाला की त्याने संघप्रवेशाची मागणी केली, तेथेच त्याची उपसंपदा झाली आणि खुप कमी काळात त्याने अर्हंतपद प्राप्त केले...

धम्मपदाच्या अट्ठकथेमध्ये, कोसंबीचा राजा उदयनच्या महाराणीने, भगवान बुद्धांनी तिच्या लग्न प्रस्तावाचा अस्वीकार केला होता हा अपमान ध्यानी ठेऊन तिने भगवानांना शिव्या द्यायला आपल्या दासांना पाठविले. ते त्यांच्याजवळ येउन म्हणु लागले - श्रमण गौतम तु चोर आहेस, तु मुर्ख, तु गाढव आहेस. यावर आनंद भगवानांना म्हणाले - भगवान.. हे लोक अभद्र बोलत आहेत. आपण दुसऱ्या नगरात चारीका करायला जाऊया. यावर सम्यक संबुद्धांनी प्रत्युत्तर दिले. - जर त्या नगरातही असेच लोक मिळतील तर मग आपण कुठे जावे...? मी युद्धामध्ये उतरलेल्या हत्तीप्रमाणे आहे, ज्याप्रमाणे युद्धामध्ये हत्ती बाणांना सहन करतो, त्याचप्रमाणे मी अपशब्द सहन करेन.

यक्ष संयुत्तामध्ये सुचीलोम आणि आळवक यक्षांनी सुरुवातीला भगवानांना त्रास देण्याचा प्रयत्न केला पण आपली डाळ शिजत नाही आहे हे पाहुन त्यांनी भगवान बुद्धांना काही प्रश्न विचारले आणि योग्य उत्तरे न दिल्यास - छाती फोडुन, दोन्ही पाय पकडुन गंगेच्या पलीकडे नेउन फेकण्याची धमकीच दिली. परंतु, भगवान बुद्धांनी या धमकीने जराही विचलीत न होता स्मित केले आणि म्हणाले - ना कोणी देव, गंधर्व, मार, असुर किंवा ब्रह्मा माझा पराभव करु शकेल. असे म्हणत त्या महाकारुणीक प्रज्ञासुर्याने यक्षांच्या प्रश्नांची योग्य उत्तरे देउन त्यांना इतके प्रभावीत केले की त्यांनी भगवानांची माफी मागुन उपासक संघप्रवेशाची याचना केली.


सुर्योदयानंतर काजवे जसे लुप्त होतात तशी विरोधकांची अवस्था झाली होती, त्यामुळे कोणत्या ना कोणत्या मार्गाने ते त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करीत होते. धम्मपदाच्या अट्ठकथेत विरोधकांनी सुंदरी नावाच्या परिव्राजीकेच्या प्राणघाताचा आरोप भगवान बुद्धांवर आणि त्यांच्या श्रावक संघावर लावला परंतु भगवान बुद्ध त्याने अस्वस्थ झाले नाहीत. त्यांनी आपल्या श्रावकांना संयम बाळगण्याचा आणि शेवटी सत्य जगासमोर आलेच.

जयमंगल अष्टगाथेच्या ५ व्या गाथेच्या कथेत चिंचा नावाची माणविका गर्भवतीचे सोंग घेउन भगवान बुद्धांवर आरोप करते - की मी श्रमण गौतमांपासुन गरोदर आहे पण भगवानांवर तिच्या निंदेचा काहीच परिणाम होत नाही आहे हे पाहुन ती घाबरली आणि तिच्या पोटाला बांधलेला लाकडाचा तुकडा ढिला झाला आणि खाली पडला ते पाहुन तिथे जमलेल्या लोकांनी तिची निंदा करीत तिला लाथाबुक्क्यांनी तुडविण्याचा प्रयत्न केला परंतु महाकारुणीक अर्हंत सम्यक संबुद्ध भगवानांनी त्यांना अडविले आणि तिला मुक्त करायला सांगीतले.


ब्राह्मण संयुत्तात भारद्वाज आणि असुरिंदक ब्राह्मण भगवान बुद्धांना शिवीगाळ करु लागले परंतु बदल्यात श्रमण गौतम क्रोध करीत नाही आहेत हे पाहून ते घाबरले. तेव्हा भगवान म्हणाले - ज्याचे चित्त्त अगदी शांत झालेले आहे अशा क्रोध रहिताला क्रोध कसला...? जो रागावणाऱ्यावर परत रागावत असतो त्याच्यामुळे त्याचीच हानी होते. क्रुद्धाच्या प्रती क्रोध न करणारा अजिंक्य, संग्राम जिंकत असतो. हे ऐकल्यावर त्यांनी संघप्रवेश केला आणि ते अर्हंतांपैकी एक झाले.


भगवान बुद्धांच्या संघामध्ये जातीभेद नव्हता, ज्याप्रमाणे नदी सागराला मिळाल्यावर तिचे पाणी ओळखणे शक्य नाही, त्याचप्रमाणे संघामध्ये प्रवेश केल्यावर त्यांची जात लोप पावत होती. सुंदरीक सुत्तामध्ये सुंदरीक ब्राह्मणाने भगवानांचे मुंडन पाहुन तो त्यांच्याजवळ गेला आणि त्यांची निंदा करत त्यांना त्यांची जात विचारली, तेव्हा भगवान शांतचित्ताने म्हणाले - जात विचारु नकोस कर्म विचार, लाकडाने सुद्धा अग्नी उत्पन्न होत असतो, नीच समजल्या जाणाऱ्या कुळातुन सुद्धा धीर मुनी होत असतात.


भगवानांच्या जीवनातुन आपल्याला प्रेरणा मिळते की जरी कोणी आपली कितीही निंदा केली तरी जराही विचलीत न होता प्रसंगाला सामोरे जावे. जर निंदकाच्या निंदेत सत्य असेल तर तात्काळ आपल्याला सुधारावे परंतु निंदकावर कोपु नये, त्याने स्वतःचीच हानी होते. निंदकाच्या प्रती नेहमीच मंगल मैत्रीची भावना ठेवावी.
यावर कल्याण मित्रांनी सांगीतलेले एक सुभाषित आठवले - हिरवळ नावाला सुद्धा दिसु नये, जो भेटतो तो कठोर व्यवहार करणारा नसावा, उगाच अपमान करणारा निघावा, सगळ्या घटना मनाविरुद्ध घडल्या तरी आपल्या मनात जरासुद्धा द्वेष बाळगत नाही तोच बुद्धाचा खरा श्रावक आहे. आपल्याला अशा अवस्थेत पोहोचण्यासाठी सतत प्रयत्नशील असायला हवे. भगवान बुद्धांची अनेकांनी निंदा केली परंतु निंदकाच्या प्रती त्यांच्या मनात नेहमीच करूणा आणि मंगल मैत्रीचीच भावना होती.





ज्याच्या विजयाचा क्रोधरुपी मार पराभव करु शकला नाही, त्या सम्यक संबुद्ध अर्हंत भगवानांना आपण आपल्या जीवनात कोणत्या मार्गाने न्याल.....?





सर्व जीव सुखी होवोत,
सर्वांना हिताचा मार्ग सापडो...


सदर पुस्तक प्राप्त करण्यासाठी फोटोवर क्लिक करा...




See Also :
भगवान बुद्धांचा धम्म निराळा आहे... (धम्मगुण - नक्की वाचा)

बोधीसत्व सुमेध आणि भगवान दीपंकर बुद्ध...

चरिया पिटक मराठी..... [Download Ebook]




















गुरुवार, २३ जानेवारी, २०१४

बोधीसत्व सुमेध आणि भगवान दीपंकर बुद्ध...


शेकडो वर्षांपुर्वी या लोकात भविष्य काळातील बुद्ध अमरावती नावाच्या संपन्न शहरात जन्मला सुमेध असे त्याचे नाव होते. सुमेध हा अमरावती शहरातील एका श्रीमंत दाम्पत्याचा एकुलता एक मुलगा होता. त्याचे पालक हे पिढीजात श्रीमंत आणि सदाचारात शुद्ध होते.


सुमेध हा शिक्षण घेत असतानाच त्याच्या पालकाचे निधन झाले, त्यावेळेस तो सोळा वर्षांचा. वयात येईपर्यंत त्याच्या खजीनदाराने त्याच्या संपत्तीचे रक्षण केले.


जेव्हा त्याने पहिल्यांदा आपली संपत्ती बघितली तेव्हा तो स्वतःशीच म्हणाला, माझे पिता, माझे आजोबा, माझे पंजोबा आणि त्यांच्यापुर्वीच्या अनेक पिढ्या केवळ या संपत्तीची कमाई करु शकले, तिचे संवर्धन करु शकले परंतु मेल्यानंतर ते त्या संपत्तीला आपल्या सोबत घेऊन जाऊ शकले नाही. हि सर्व संपत्ती मी आपल्या सोबत घेऊन जाऊ शकणार काय..?


त्याचक्षणी त्याने यावर अतिशय खोल विचार केला. आणि त्याच्यात नवे चैतन्य संचारले. त्याने विचार केला कि जिथे उष्णता आहे तिथे शितलता नक्कीच आहे. त्याचप्रमाणे जिथे मरण आहे तिथे अमरता असायला हवी.


त्यानंतर त्याने आपल्या खजीन्याचे घर उघडले आणि आपली सर्व संपत्ती दान केली. आणि तो परिव्राजक बनला. केवळ सात दिवसांमध्येच त्याला श्रेष्ठ मानसीक शक्ती प्राप्त झाली....




भगवान दीपंकर बुद्धांचे आगमन



भगवान दीपंकर बुद्धांच्या आगमनाचा तो सोनेरी क्षण होता. शहरातील लोक बुद्धांच्या आगमनाची तयारी करत होते. रस्त्यांची सजावट दुरुस्ती चालली होती, सर्वजन भगवान दीपंकर बुद्धांची आतुरतेने वाट पाहत होते. श्रमण सुमेधाने बघितले कि नागरीक शहराच्या सजावटीमध्ये व्यस्त आहेत. हे सर्व पाहुन त्याला अश्चर्य वाटले. तो त्यांच्या जवळ आला आणि सुरु असलेल्या प्रकाराबद्दल विचारणा केली. तेव्हा त्यांनी सांगीतले कि आम्ही हे ऐकुन श्रमण सुमेधाला अतिशय आनंद झाला आणि तो म्हणाला, बुद्ध हा शब्द ऐकणे खुप कठीण आणि दुर्मीळ आहे आणि बुद्धत्वाची प्राप्ती करणे अतिशय कठीण. श्रमण सुमेधाने विनंती केली कि मला सुद्धा तुमच्या या पवित्र कार्यामध्ये सहभागी होऊ द्या.


रस्ते दुरुस्तीचे आणि शहर सजावटीचे कार्य त्याला त्याच्या असामान्य कार्यक्षमतेने करावे लागणार होते. परंतु ते काम पुर्ण होण्यापुर्वीच भगवान दीपंकर बुद्धांचे त्यांच्या श्रावक संघासोबत शहरात आगमन झाले. भगवान बुद्धांच्या पवित्र पायांना धुळीने स्पर्श होऊ नये यासाठी श्रमण सुमेध एखाद्या पुलाप्रमाणे आडवा झाला.


भगवान बुद्धांची ती आर्य किर्ती पाहुन सुमेधला वाटले कि, माझी तर इच्छा आहे कि मी आजच अर्हंतपदाची प्राप्ती करावी. परंतु माझ्यासाठी चुकिच्या मार्गावर असलेल्यांना योग्य मार्गावर आणने हे सध्या योग्य नाही जेव्हा सर्व प्राण्यांचे जीवांचे संरक्षण करण्याची शक्ती माझ्याकडे आहे. मी भगवान दीपंकर बुद्धांप्रमाणे बुद्ध बनण्याचा प्रयत्न करेन..


त्यानंतर सुमेध म्हणाला,



• बुद्धो बोदेय्यम : मी चार आर्यसत्य जाणु शकेन जेणे करुन मी इतरांना त्यांच्याबद्दल सांगु शकेन.




• मुत्तो मोचेय्यम : ज्याप्रमाणे मी जीवनाच्या बंधनातुन मुक्त झालो त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे त्या सर्व बंधनातुन मी सर्वांना मुक्त करेन.




•तिन्नो तरेय्यम : ज्याप्रमाणे मी जीवनाचा अर्णव तरलो त्याचप्रमाणे इतरांनाही त्याबद्दल मार्गदर्शन करेन..



त्या तेजस्वी सुमेधाला पाहुन भगवान दीपंकर बुद्ध म्हणाला, हा तरूण श्रमण आपल्या जीवाची पर्वा न करता पुलासारखा जमीनीवर लेटुन आहे, यात काही संशय नाही कि भविष्यामध्ये हा माझ्यासारखा सम्यक संबुद्ध बनेल.




भगवान बुद्धांच्या वाणीतुन हि गोष्ट कळताच नागरीकांना अतिशय आनंद झाला आणि त्यांनी सुमेधाचा आदर सत्कार केला.


भगवान बुद्ध त्याच्या अंगावर पाय ठेऊन समोर गेले नाही, भगवान बुद्धांप्रमाणेच त्याचा बाजुने समोर गेले. भगवान दीपंकर बुद्धांच्या या वक्तव्याचा श्रमण सुमेधाने अतिशय आदरपुर्वक स्वीकार केला. त्यामुळे त्याला अतिशय आनंद झाला होता...


भगवान बुद्धांनी देव व मनुष्यांची एक परिषद बोलाविली ज्यामध्ये त्यांनी सांगीतले कि सुमेध हा बुद्धत्वाची प्राप्ती करणार. भगवान बुद्धांनी, अर्हंतांनी, देवांनी व मनुष्यांनी त्या सभेमध्ये सुमेधाला पुष्पगुच्छ भेट दिले आणि भगवान बुद्धांना त्याने नमस्कार केला आणि भगवान बुद्धांनी सुमेधाला दहा पारमितांची देशना केली.


त्या पुढीलप्रमाणे :



• दान
• शील
• नैष्कर्म
• विर्य
• क्षांती
• सत्य
• अधिष्ठान
• मैत्री
• उपेक्षा...


हे ऐकताच उपस्थीत सर्व जन उद्गारले साधू..! साधू..! साधू..!


बोधीसत्व बनल्यावर मनुष्य खालील व्याधींपासुन मुक्त होतो.


• आंधळेपणा
• बहिरेपणा
• वेडेपणा 
• मुकेपणा 
• लंगडे पणा
• तो रानटी राष्ट्रामध्ये जन्म घेत नाही.
• तो गुलामाच्या गर्भात जन्म घेत नाही.
• तो चुकिच्या श्रद्धांपासुन (अंधश्रद्धा) मुक्त होतो.
• तो पाच गुन्ह्यांपासुन मुक्त होतो. तो आपल्या माता पित्याचा आणि अर्हंताची हत्या करु शकत नाही. आणि बुद्धालाही कोणती हानी पोहोचवु शकत नाही. 
• तो कुष्ठरोगापासुन मुक्त होतो.. इत्यादी..


निरनिराळ्या बोधीसत्वांच्या काळात बोधीसत्वाने अनेक जन्म घेतले ते पुढीलप्रमाणे :

१. दीपंकर बुद्धां : सुमेध
२. कौण्डिण्य बुद्ध : विजितवी
३. मंगल बुद्ध : सुरुची
४. सुमन बुद्ध : अतुल
५. रेवत बुद्ध : अतिदेव
६. शोभीत बुद्ध : सुजाता
७. अनोमदस्सी बुद्ध : यक्ष
८. पदुम बुद्ध : सिंह
९. नारद बुद्ध : परिव्राजक
१०. पदुमुत्तरा बुद्ध : जटील
११. सुमेध बुद्ध : उत्तरा
१२. सुजाता बुद्ध : सम्राट
१३. पियदस्सी बुद्ध : कश्यप
१४. अत्तदस्से बुद्ध : सुशिम (परिव्राजक)
१५. धम्मदस्सी बुद्ध : शक्र (देवांचा राजा)
१६. सिद्धार्थ बुद्ध : मंगल (परिव्राजक)
१७. तिस्स बुद्ध : सुजीत (राजा)
१८. फुस्स बुद्ध : विजितवी (राजा)
१९. विपस्सी बुद्ध : ड्रॅगन
२०. सिखी बुद्ध : अरिंदम
२१. वेस्सभु बुद्ध : सुदर्शन (राजा)
२२. कुकुसंध बुद्ध : खेमा
२३. कोनागमन बुद्ध : पब्बत (राजा)
२४. काश्यप बुद्ध : ज्योतीपाल

खुप काळानंतर बोधीसत्वाने दहा पारमिता आचरणात आणल्या, आणि त्याने त्याचा शेवटचा जन्म शाक्य कुळातील राजा शुद्धोधनाची पत्नी महामाया हिच्या गर्भात घेतला, वयाच्या एकोणतीसाव्या वर्षी त्याने गृहत्याग केला आणि सहा वर्षाच्या कठोर तपश्चर्येनंतर बुद्धत्त्वाची प्राप्ती करुन घेतली...

सदर पुस्तक प्राप्त करण्यासाठी फोटोवर क्लिक करा...



See Also :


भगवान बुद्धांचा धम्म निराळा आहे... (धम्मगुण - नक्की वाचा)

नव-बौद्धांवर वाढत चाललेला अजीत केसकंबलाच्या पंथाचा प्रभाव : धोक्याची घंटा....

गृहस्थांची कर्तव्ये... (पुजेचा खरा अर्थ : नक्की वाचा)

जयमंगल अष्टगाथा आणि त्यांच्या कथा (भाग ६ : सच्चक नावाच्या निर्गंथ पुत्रावर विजय)

शनिवार, २८ डिसेंबर, २०१३

भगवान बुद्ध (भाग - १ : जन्मापासुन संबोधीप्राप्ती पर्यंत)

१. ख्रिस्तपुर्व सहाव्या शतकात भारत हा एकसंघ राष्ट्र नव्हता, तो विविध राज्यांमध्ये विभागला होता, त्यांना सोळा महाजनपदे असे म्हणतात.


२. त्यावेळेस शुद्धोधन हा कपिलवस्तुचा राजा होता परंतु कपिलवस्तुवर त्याची सत्ता चालत नव्हती कारण कपिलवस्तुची शासन पद्धती हि गणराज्य पद्धतीची होती.


३. राजा शुद्धोधनाला दोन बायका होत्या. १. महामाया आणि २. महाप्रजापती. महाप्रजापती हि राजाची दुसरी पत्नी असली तरी ती महामायेची मोठी बहीण होती.


४. महामायेने दहा महिने पोटात वाढविल्यानंतर सिद्धार्थाला जन्म दिला, आणि सात दिवसांनीच महामायेचे निधन झाले. त्यानंतर सिद्धार्थाचे पालन पोषण त्याची मावशी महाप्रजापतीने केले.


५. तत्पुर्वी असीत नावाच्या ॠषीने सिद्धार्थाबद्दल भविष्यवाणी केली होती कि हा बालक बुद्ध बनणार..


६. सिद्धार्थाला नंद नावाचा लहान भाऊ होता, नंद हा महाप्रजापतीचा मुलगा होता. याशिवाय सिद्धार्थाला अनेक चुलत भाऊ होते. त्यामध्ये अनुरुद्ध, महानाम, आनंद. तर देवदत्त हा त्याचा आत्येभाऊ होता.


७. वयाच्या आठव्या वर्षापासुन सिद्धार्थाच्या शिक्षणाला सुरुवात झाली. सर्वमित्र हा त्याचा दुसरा गुरू होता. याशिवाय भारद्वाज जो आलारकालामाचा शिष्य होता त्याने सिद्धार्थाला ध्यान साधनेचे शिक्षण दिले.


८. जेव्हा केव्हा सिद्धार्थ आपल्या पित्यासोबत शेतावर जायचा त्यावेळेस तो समाधी अवस्थेत बसायचा.


९. शुद्धोधनाने सिद्धार्थाला बौद्धिक विकासाच्या, क्षत्रीयत्वाच्या सर्व प्रकारचे शिक्षण दिले, सिद्धार्थाच्या अंतकरणात करुणा होती, माणसाला त्रास द्यायला त्याला आवडत नसेल.


१०. वयाच्या सोळाव्या वर्षी यशोधरा हिच्याशी सिद्धार्थाचे लग्न झाले, आणि त्यांना एक मुलगा झाला त्याचे नाव राहुल असे ठेवण्यात आले.


११. वयाच्या वीसव्या वर्षी सिद्धार्थाने शाक्य संघाची दीक्षा घेतली. संघाचा तो एकनिष्ठ सभासद होता. तो संघाचा सभासद झाल्यानंतर वयाच्या आठव्या वर्षी अशी घटना घडली ज्याने त्याचे आयुष्यच बदलुन गेले. शाक्य राज्याच्या सिमेला कोलीय राज्य होते आणि रोहीणी नदीने त्यांची सीमा निश्चित केली होती आणि या नदीच्या पाण्यावरुन दोन राज्यांमध्ये वाद निर्माण झाला होता. आणि शाक्यसंघाने कोलीयांविरुद्ध युद्ध पुकारले, परंतु सिद्धार्थाने मात्र याला विरोध केला.


१२. यावर शिक्षा म्हणुन शाक्य संघाने सिद्धार्थापुढे तीनपैकी एक मार्ग निवडण्याचे सांगीतले. १. युद्धात सामील होणे, २
. देहांत किंवा देशत्याग ३. कुटुंबावर सामाजीक बहिष्कार. यापैकी सिद्धार्थ दुसरा पर्याय निवडतो. आणि देशत्यागाची तयारी करतो. आणि सर्वांचा निरोप घेऊन परिव्राजक होण्यासाठी घरातुन बाहेर पडतो. स्वकीयांच्या बहुमतापुढे आपले शीर न झुकवता स्वेच्छेने शिक्षा पत्करणारा तो शाक्य युवक होता...


१३. आपल्या बायको, मुलाला आणि परिवाराला सोडुन संन्यास घेणे हा सिद्धार्थाचा बेजबाबदारीपणा होता असा आरोप अनेक अज्ञानी करत असतात परंतु त्यांनी हि गोष्ट ध्यानात ठेवावी कि,, सिद्धार्थाला आपल्या परिवाराला सोडुन संन्यास धर्म स्वीकारणे म्हणजे सोपी गोष्ट नव्हती. त्याच्यासमोर दोन पर्याय होते, एक म्हणजे त्याचा परिवार आणि दुसरा हे जग.. त्यापैकी त्याने दुसरा पर्याय निवडला. त्याने जगाला करुणा शिकवली. त्याने त्यावेळेस केलेल्या त्यागामुळे आज संपुर्ण विश्वाला त्याच्या तत्त्वज्ञानाचा आधार मिळालेला आहे. त्यामुळे सिद्धार्थाचे ते कृत्य बेजबाबदारपणाचे नव्हते तर मानवाच्या कल्याणा करिता केलेल्या त्यागाचे ते सर्वोत्कृष्ट उदाहरण होते...


१४. गृहत्यागानंतर सिद्धार्थ सर्वप्रथम बिंबीसार राजाची राजधानी राजगृहाकडे जातो. राजगृह कपिलवस्तुपासुन सुमारे चारशे मैल अंतरावर आहे. हा दीर्घ प्रवास सिद्धार्थाने पायीच केला. तेथे त्याची बिंबीसार राजाशी भेट झाली.


१५. त्यानंतर त्याची भेट पाच परिव्राजकांसोबत त्यांची नावे पुढीलप्रमाणे : कौण्डिण्य, अश्वजीत, कश्यप, महानाम, भद्रिक. सिद्धार्थाचे रुप पाहुन ते थक्क झाले.


१६. इकडे कपिलवस्तुमध्ये सिद्धार्थाच्या गृहत्यागाचे पडसाद उमटु लागले. जनता निदर्शने करु लागली, परिणामी शाक्य संघाला परत सभा बोलावुन शांततेची घोषणा करावी लागली. हि गोष्ट सिद्धार्थाला त्या परिव्राजकांकडुन समजली.


१७. आलारकालाम यांची भेट घेण्यासाठी सिद्धार्थाने राजगृह सोडले, वाटेत तो भृगु ॠषींच्या आश्रमात थांबला. तेथे काही काळ थांबल्यानंतर तो आलारकालामच्या निवासाकडे निघाला. आलारकालाम त्यावेळेस वैशालीला राहायचा.


१८. आलारकालामाकडुन सिद्धार्थाने सांख्य तत्त्वज्ञाची तत्त्वे शिकुन घेतली. आलारकालामांनी केलेल्या विवरणामुळे सिद्धार्त गौतम आनंदित झाला.


१९. आपल्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी विविध प्रकारचे प्रयत्न करणाऱ्या सिद्धार्थाला ध्यानमार्गाची (समाधी) माहीती घ्यावी असे त्याला वाटले. आलारकालामांनी सिद्धार्थाला ध्यानमार्गाचे तंत्र शिकविले. त्याच्या एकुण सात सिद्धी होत्या.


२०. या ध्यानमार्गाच्या तंत्रानंतर आलारकालामाकडे सिद्धार्थाला शिकविण्यासाठी काहीच नव्हते म्हणुन सिद्धार्थ आलारकालामाचा निरोप घेऊन तिथुन निघुन गेला.


२१. त्याच्यानंतर तो उद्दकरामपुत्र याच्याकडे गेला, उद्दकरामपुत्र हा कोशल राष्ट्रामध्ये समाधीमार्गासाठी प्रसीद्ध होता. उद्दकरामपुत्राने आलारकालामापेक्षा समाधीमार्गातील वरची पायरी शिकवली.


२२. त्यानंतर सिद्धार्थ उरुवेला येथे गेला. उरुवेला म्हणजेच आत्ताचे बुद्ध गया शहर. उरुवेला येथे वैराग्य मार्गाचा अभ्यास करण्यासाठी तो एका ॠषीच्या आश्रमात गेला.


२३. वैराग्य मार्गाचा अभ्यास करण्यासाठी त्याने निरंजना नदीजवळील एकांतातील स्थळ निवडले. राजगृहात भेटलेले ते पाच परिव्राजक, ज्यांनी सिद्धार्थाला शांततेची वार्ता सांगीतली होती. ते देखील वैराग्य मार्गाचा अभ्यास करत होते.


२४. त्यानंतर ते पाच परिव्राजक त्याच्या आज्ञेत शिष्याप्रमाणे वागत होते. आदरभावाने त्याची सेवा करत होते. सिद्धार्थाने वैराग्य मार्गाचा अभ्यास करायला सुरुवात केली.


२५. गौतमाने सुरु केलेली तपश्चर्या व त्यातुन होणारे आत्मक्लेश याचे स्वरुप अतिशय उग्र होते. दररोज तो फक्त एक वाटी अन्नावर जगत असे. कधी कधी तर पंधरवाड्यातुन एकदा अशा अन्नावर तो जगत होता. वैराग्याच्या निरनिराळ्या पद्धतीचा अवलंब करत तो शरीराला पराकाष्टेच्या यातना देत जगु लागला.


२६. घोर अरण्यात त्याने वस्ती केली होती. तो भाग कोणाच्या अंगाचा थरकाप उडेल इतका भयानक होता. हिवाळ्याच्या कडक थंडीत तो समाधी अवस्थेत न हलता राहायचा, कडक उन्हाळ्यात अंग भाजुन टाकणाऱ्या उन्हात तो राहत असे.


२७. काही दिवसानंतर तांदळाच्या किंवा तिळाच्या एका दाण्यावर तो जगु लागला. अशाप्रकारे आपल्या शरीराला अतिशय कष्ट देत तपश्चर्या करु लागला. त्यामुळे त्याचे शरीर अतिशय क्षीण झाले होते. त्याचे शरीर म्हणजे हाडाचा सापळाच बनला होता. अशी हि तपश्चर्या सहा वर्षे चालली होती.


२८. या यातनांमुळे त्याचे शरीर अतिशय क्षीण झाले होते, इतके कि त्याला हालचालही करता येत नव्हती. तरीसुद्धा त्याला प्रकाशाची किरण दिसत नव्हती.


२९. त्यावेळी उरुवेला येथील सुजाता नावाच्या स्त्रीने वटवृक्षाला केलेला नवस फेडण्यासाठी ती वटवृक्षाजवळ जाण्यासाठी निघाली असता, वटवृक्षाखाली गौतमाला बसलेले बघुन जणु काही वृक्ष देवताच अवतरली असे तिला वाटले.


३०. सुजातेने त्याच्यासाठी खीर बनवली व ते सोन्याच्या पात्रात गौतमाला वाढले. ते पात्र घेऊन तो नदीजवळ गेला, अंघोळ केली व खीर खाल्ली अशाप्रकारे सिद्धार्थाने वैराग्यमार्ग त्यागला.


३१. तपश्चर्या व आत्मक्लेश यांच्या केलेल्या त्यागामुळे ते पाच परिव्राजक गौतमाला सोडुन गेले.


३२. वैराग्य मार्गाचा त्याग केल्यावर गौतमाने जागा बदलवली तो पिंपळाच्या झाडाखाली पद्मासन अवस्थेत बसला. वैशाख पोर्णीमेच्या रात्री बोधीसत्त्व बुद्धत्व प्राप्तीसाठी प्रयत्न करतो हे पाहुन माराला अतिशय वाईट वाटले... आणि मार बोधीसत्त्वासोबत युद्ध करण्यासाठी आला. मारासोबत बोधीसत्त्वाचे झालेल्या युद्धाबद्दल वाचण्यासाठी लिंकवर जा...

बोधीसत्व आणि मारामधील युद्ध


३३. माराला युद्धामध्ये पराभुत केल्यावर, मनातील वाईट विचार काढुन टाकल्यावर गौतम पुन्हा ध्यानमग्न अवस्थेत बसला. आणि गौतमाला ज्ञान प्राप्ती झाली. ज्ञान प्राप्ती साठी गौतमाला चार आठवडे ध्यानमग्न राहावे लागले. चार पायऱ्यांनी त्याने संपुर्ण ज्ञानाची प्राप्ती करुन घेतली. आणि बोधीसत्त्व सम्यक संबुद्ध बनला...


क्रमशः

सदर पुस्तक प्राप्त करण्यासाठी फोटोवर क्लिक करा...


See Also :

भगवान बुद्धांचा धम्म निराळा आहे... (धम्मगुण - नक्की वाचा)

मराठी धम्मपद

रोहीणीच्या वडिलांची धम्मदीक्षा...

गुरुवार, ३ ऑक्टोबर, २०१३

भगवान बुद्ध : सत्याचा सर्वोत्तम शिक्षक......

भगवान बुद्ध, एक सर्वोच्च परिपुर्ण सम्यक संबुद्ध ( संपुर्ण जागृत). स्वतःच्या तेजोमय प्रकाशाने ज्याने ह्या विश्वातील अंधकार नाहीसा केला असा उज्ज्वल सुर्य म्हणजे तथागत भगवान बुद्ध..

तो आमचा मार्गदर्शक तारा आहे,, तो आम्हाला दुःखमुक्तीचा मार्ग सांगतो...

एक असा ज्याने संपुर्ण आयुष्यभर सर्व प्राणीमात्रांच्या सुखाकरिता प्रज्ञा, शील, व करुणेचा प्रसार केला... असा सत्याचा शिक्षक.


काय तो ईश्वर आहे?? ईश्वराचा अवतार किंवा त्याचा पुत्र आहे?? असा त्याने कधी दावा केला आहे काय? काय तो आपल्यासारखा मनुष्य आहे??


एक दिवस एका ब्राह्मणाने सम्यक संबुद्धाशी संपर्क साधला. आणी काही प्रश्न विचारले,,, आदरणीय महोदय,, तुम्ही यक्ष, गंधर्व किंवा इंद्र आहात काय? तुम्ही देवता आहात काय?? ईश्वर पुत्र आहात? ईश्वराचा अवतार आहात? कि तुम्ही ईश्वर आहात?? कि मनुष्य आहात??


ब्राह्मणाच्या ह्या प्रश्नावर,, पवित्र सम्यक संबुद्ध उत्तरले,, हे ब्राह्मणा,, मी त्या कमळासारखा आहे कि जो चिखलातुन बाहेर येतो.. मी यक्ष, गंधर्व किंवा इंद्र नाही. कारण मला अश्रु येत नाही, दुःख होत नाही..माझे आश्रव क्षीण झाले आहेत. मला तु संपुर्ण जागृत असा समज..

सर्वोच्च बुद्ध हे गंधर्व, यक्ष, इंद्र, ब्रह्मा आणी मनुष्य हे सर्वांच्या पलीकडे गेले आहेत..

सर्वोच्च सम्यक संबुद्ध आजपर्यंत झालेला जगातील महान शिक्षक होता.


त्या प्रज्ञावंत भगवान बुद्धाला आपण आपला शिक्षक का मानतो??


त्यांच्या एका महान शिष्य,, एका महान अरहंताच्या शब्दात :

अरहंत सेनेका (एक असा भिक्खु जो जन्म आणी मृत्युच्या बंधनातुन मुक्त झालेला आहे.) त्याने म्हटले,,


तो (सम्यक संबुद्ध) त्याच्याकडे सर्वोच्च प्रज्ञा आहे. तो आपल्या महान शिष्यांसाठी प्रज्ञेचा सर्वोच्च शिक्षक आहे. तो साऱ्या विश्वात सर्वोच्च आहे. तो सर्व देव आणी मनुष्यांसाठी सत्याचा शिक्षक आहे. अर्हंत सम्यक संबुद्ध, विद्या व आचरणांनी युक्त, सुगती ज्याने प्रगती प्राप्त केलेली आहे. सर्वश्रेष्ठ, दमनशील पुरुषांचा सारथी व आधार देणारा देवमनुष्य व मनुष्य यांचा गुरु असा हा भगवान बुद्ध आहे.अशा प्रज्ञावंताला पाहणे दुर्मीळ आहे.


तो एका शक्तीशाली हत्ती सारखा आहे. त्याच्यात असे महान प्रयत्न सामील आहेत. त्याच्यात महत्त्वकांक्षा आहे. तो सर्व दुःखमुक्त आहे.



भगवान बुद्धाच्या शिष्याने त्याची इतकी प्रशंसा का केली आहे?? त्या सर्वोच्च सम्यक संबुद्धाचे गुण काय आहेत?

भगवान बुद्ध हे अरहंत आहेत : संपुर्ण जागृत असा परिपुर्ण..

सम्यक संबुद्ध ह्यांनी मनाला होणाऱ्या विकारांवर कसा उपचार करता येईल याचा शोध लावला, ते,, राग, लोभ, द्वेष, मत्सर, मोह, कामवासना,इत्यादी, विकारांपासुन मुक्त होते.

भगवान बुद्धानी सर्व प्रकारच्या भावनांवर विजय मिळवला होता. त्यांचे शरीर वाणी आणी मन शुद्ध होते. म्हणुनच आम्ही त्यांच्यासाठी पुढील गाथा म्हणतो...

इतिपी सो भगवा अरहं सम्मा संबुद्ध, विज्जाचरण संपन्नो सुगतो लोकविधु अनुत्तरो पुरिसधम्मसारथी सत्था देवमनुस्सान बुद्धो भगवा ति!


यात सम्यक संबुद्ध म्हणजे ,, पुर्ण पणे प्रबुद्ध,, कोणत्या गुरु विना ज्याने चार आर्य सत्य समजले असा.

विज्जाचरण संपन्नो म्हणजे जो सत्य प्रज्ञा समजुन घेतो आणी त्याला आचरणात आणण्याचा प्रयत्न करतो असा.

सुगतो : असा ज्याने आर्य अष्टांगिक मार्गाचा पालन करुन निर्वाण पद प्राप्त केले आहे.


लोकविधु : सर्वोच्च ज्ञानी,,, ह्या विश्वाचे सत्य जाणणारा. ह्या विश्वाचे मुळ ज्याला समजला, सर्व प्रकारच्या संसारापासुन मुक्ती आणी विश्वाची समाप्ती ज्याला समजली असा.


पुरिसधम्मसारथी : श्रेष्ठ व दमनशील पुरुषांचा सारथी असा हा आमचा शिक्षक ज्याने कोणत्याही हत्याराविना आपल्या असीम करुणेने सर्वांना जिंकुन घेतले असा..


सत्था देवमनुस्सान : असा हा भगवान बुद्ध सर्व देव आणी मनुष्यांचा गुरु आहे.


बुद्ध : कोणाच्याही मदतीशिवाय ज्याने देव आणी मनुष्यांच्या कल्याणाकरिता चार आर्यसत्य जाणुन घेतले. दहा पारमिता पुर्ण करुन निर्वाण पद प्राप्त करुन घेतले असा.. महान प्रीती आणी करुणेचा शिक्षक..


भगवा : The blessed one.. एक धन्य, पवित्र असा..

भगवान बुद्ध आमचा महान शिक्षक, फक्त तोच असा पवित्र शिक्षक आहे ज्यामध्ये वरील सर्व गुण आहेत..

असा हा प्रज्ञावंत करुणासागर बुद्ध, सर्व वैज्ञानिक, आत्तापर्यंत झालेले सर्व तत्वज्ञानी, आणी विश्वातीलातील सर्व प्रकारच्या देव आणी मनुष्यांमध्ये श्रेष्ठ आहेत.

त्यांच्या शिकवणीतुन आम्हाला हे समजते कि ती सर्व प्रकारच्या विज्ञानापेक्षा खुप पुढे आहे. आजचा विज्ञान बुद्धाच्या ज्ञानापुढे अजुनही मागासलेला आहे. भगवान बुद्धांनी अडीच हजार वर्षांर्वी जो शोध लावला,, तो शोध विज्ञान आत्ता लावत आहे. तर अनेक शोध अजुन लागलेले नाही आहेत.

आत्तापर्यंतच्या कोणत्याच शिक्षकाने स्वतः परिपुर्ण असल्याची योग्यता सिद्ध केली नाही. जि भगवान बुद्धाने केली आहे. म्हणुन तो परिपुर्ण असा, मौल्यवान रत्न, आणी संपुर्ण जागृत असा सम्यक संबुद्ध सर्वोच्च शिक्षक आहे.


खरेच तो धन्य होता. तो सर्वोच्च विद्वान होता त्याच्यापाशी संग्रहवृत्तीचा लेशही नव्हता. तो उत्साही आणी कष्टाळु होता. त्याला पापाची घृणा वाटत असे. क्षमाशिलतेत तो पृथ्वीसमान होता. त्याने आपल्या मनात क्रोधाला कधीही प्रवेश करु दिला नव्हता. कोणत्याही इच्छेच्या आहारी तो गेला नव्हता. विकार-वशतेवर त्याने विजय मिळवला होता. करुणा, बंधुभाव आणी प्रीती ही त्याच्या ठायी परिपुर्ण होती..





ज्याला विषाचे जाळे पसरविणारी तृष्णा कोठेही नेऊ शकत नाही,, त्या विस्तीर्ण हिरवळ रुपी निष्कलंक बुद्धांना तुम्ही आपल्या जीवनात कोणत्या मार्गाने न्याल?

सदर पुस्तक प्राप्त करण्यासाठी फोटोवर क्लिक करा...




Read Also :


१. बुद्ध पुजा : पाली (Buddha Vandana in Pali)

२. बौद्ध पुजा आणि त्याबद्दल निर्माण होणारे गैरसमज

३. Buddha Vandana : English

४. बुद्ध वंदना : मराठी


५. भगवान बुद्धांचा शीलमार्ग......


६. प्रबुद्ध भारताची सोनेरी सुरुवात : मराठी धम्मपद